०८ जुलै, २०१२
०८ जुलै, २०१२

100 दशलक्ष प्रतिमा

Snapchat ला तुम्ही सतत दिलेल्या समर्थनाबद्दल आम्‍ही तुम्‍हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. आमच्या सेवा द्वारे 110 दशलक्षाहून अधिक प्रतिमा पाठवल्या गेल्या आहेत! व्वा! आम्ही तुमच्याशिवाय हे करू शकलो नसतो.

मागील काही आठवड्यांमध्ये बरेच काही घडले आहे. दोन अतिशय उत्कृष्ट आणि प्रतिभावान अभियंते (आणि मित्र) टीममध्ये समाविष्ट झाले आहेत हे घोषित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे - डॅनियल आणि डेव्हिड तुमचे स्वागत असो! आम्ही डेना या अप्रतिम समुदाय व्यवस्थापिकेला देखील नियुक्त केले आहे, ती आम्हाला आमच्या प्रचंड ईमेल बॅकलॉगमधून बाहेर काढण्यासाठी आधीपासूनच मदत करत आहे. जर तुम्ही अद्यापही सपोर्टसाठी प्रतीक्षा करत असाल (तर क्षमा करा!) आम्ही वचन देतो की मदत करणे चालू आहे.

सध्या आम्ही एक अतिजलद आणि मनोरंजक अपडेटची चाचणी करत आहोत व तो या महिनाअखेरीस आणला जाईल. iOS डिव्हाईसवर तुमच्या जवळ लवकरच पासवर्ड रिकव्हरी, बग फिक्सेस, जलद कॅमेरा आणि ड्रॉईंग ही वैशिष्ट्ये आणली जात आहेत. आम्ही अत्यंत गुप्त अशा गोष्टींवरही काम करत आहोत.

आमच्या अँड्रॉईड चाहत्यांसाठी – आम्ही तुमच्या सर्व डिव्हाईसेससाठी सर्वोत्तम स्नॅपचॅट अनुभव निर्माण करण्यासाठी मेहनत घेत आहोत. ते सोपे नाही पण ते एक उत्तम उत्पादन असेल याची आम्हाला खात्री करावयाची आहे. जर प्री-रिलीज आवृत्तीची चाचणी करण्यात तुम्हाला स्वारस्य वाटत असेल तर आम्हाला एक ईमेल पाठवा.

शेवटचे पण महत्त्वाचे म्हणजे – तुम्ही सातत्याने स्नॅपचॅटला करत असलेल्या सपोर्टबद्दल आम्ही तुमचे आभार मानू इच्छितो. आमच्या सेवेच्या माध्यमातून 110 दशलक्षांहून अधिक प्रतिमा पाठविण्यात आल्या आहेत! व्वा! तुमच्याशिवाय हे करणे शक्य झाले नसते.

बातमतयांकडे पुन्हा एकदा