आज, आम्ही Bitmoji Paintची घोषणा करीत आहोत, स्नॅपचॅटमध्ये एक नवीन खेळ आहे ज्यामध्ये एका भव्य कोलाजला सहकार्य करण्यासाठी लाखो खेळाडू एकाचवेळी एकत्र येऊ शकतात.
स्नॅप गेम स्टुडीओने तयार केलेल्या, Bitmoji Paint स्नॅपचॅटमध्ये एक संपूर्ण नवीन खेळांची शैली सादर करीत आहे. स्नॅपचॅटर्सचे Bitmojis जगभर प्रवास करतात, मित्रांशी जोडले जातात आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला मोकळेपणाने एकाच कॅनव्हासवर संचार करू देतात. साधी रेखाटने, गमतीशीर मेसेजेस किंवा भव्य देखावासुद्धा Bitmoji Paintमध्ये शक्य आहे.
ते कसे कार्य करते:
खेळाडू चॅटमधून (रॉकेटच्या चिन्हाच्या मागे) किंवा सर्चमधून या खेळामध्ये प्रवेश करू शकतात, आणि अवकाशामध्ये तरंगणाऱ्या अनेक बेटांचा ग्रहांच्या साहाय्याने सामना करतात.
प्रत्येक बेट हा एक सर्व्हर आहे ज्यामध्ये प्रत्येक खेळाडू इतर खऱ्या शेकडो खेळाडूंबरोबर खेळू शकतो. जेव्हा खेळाडू खेळामध्ये दाखल होण्यासाठी बेट निवडतात, त्यावेळी त्यांना सुरु असलेल्या खेळामध्ये जागा आणि बदल करता येणारा कॅनव्हास मिळतो.
खेळाडू आता चित्र काढू शकतात, शोध घेऊ शकतात आणि मूव्ह, पेंट आणि मॅप या तीन मार्गांनी हँगआऊट करू शकतात.
तुम्ही नैसर्गिकरित्या इतर स्नॅपचॅटर्सचा सामना करू शकतात, आणि आपल्या भावनांच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधू शकतात.
याच्याशी निगडित नसलेले काही पहिले आहे का? आमच्या अॅपमधील रिपोर्ट करण्याच्या पर्यायामध्ये जाऊन तातडीने रिपोर्ट करा.
अँड्रॉइडच्या वापरकर्त्यांसाठी आम्ही त्यांना सानुकूलित Bitmoji Paintचा अनुभव मिळावा म्हणून स्नॅप टोकन सादर करीत आहोत. स्नॅप टोकन हे डिजिटल वस्तू आभासी कप्प्यांमध्ये खरेदी करून आणि साठविण्याचे ठिकाण आहे जे तुमच्या स्नॅपचॅट खात्याशी जोडलेले असते. अँड्रॉईडमधील Bitmoji Paintमध्ये, खेळाला अधिक जलद गतीने फिरविण्यासाठी रोलर स्टॅक्स किंवा हॉवरबोर्ड्स किंवा मोठी निर्मिती करण्यासाठी इंक पेंटर किंवा पेंट रोलर सारख्या गोष्टींसाठी स्नॅप टोकनचा वापर करतात.
आज पासून Bitmoji Paint संपूर्ण जगासाठी खुले झाले आहे. एका नवीन कलात्मक जगामध्ये भविष्याला आकार देण्यासाठी आमचा समुदाय काय निर्मिती करतो हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.