२२ जून, २०१३
२२ जून, २०१३

iOS Update: Bug Fixes and More

There’s a new iOS version available in the App Store today. It includes some critical fixes for bugs and crashes, so please download it if you’ve been experiencing issues.

टीम Snapchatने या महिन्यात मोठी झेप घेतली आहे आणि वाढते आहे. उन्हळ्याचा हा ऋतु त्याच्याबरोबर इंजिनीरिंग इंटर्न्स आणि नवीन टीम मेंबर्स घेऊन आला आहे. प्रगतीचे वेग वाढवतांना आम्हाला उत्साह जाणवत आहे.

आज App Store वर एक नवीन iOS संस्करण उपलब्ध आहे. त्यामध्ये बग आणि क्रॅशसाठी काही तातडीचे समाधान उपलब्ध आहेत, म्हणून तुम्हाला समस्या जाणवत असल्यास त्यांना डाउनलोड करा.

आम्ही या आवृत्तीमध्ये काही नवीन करण्याच्याही प्रयत्नात आहोत. जसे की तुम्हाला माहीत आहे, Snapchat किशोर आणि वयस्कांसाठी आहे 13 वर्षांखालील वयाच्या मुलांना खाते बनवण्याची परवानगी नाही. मागील iOS अपडेटमध्ये एज-गेटिंग आणले गेले, ज्यामध्ये आम्ही कोणीही नोंदणी करत असतांना स्क्रीनवर त्याचे वय विचारले आणि वय 13 पेक्षा कमी असल्यास त्यांना परवानगी दिली नाही. ही अशा गोष्टींना हाताळण्याची एक साधी मानक पद्धत होती, पण यातून आलेला अनुभव काही चांगला नव्हता. म्हणून, आता एज गेटिंगसोबतच, आम्ही थोडे काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन iOS संस्करणामध्ये, 13 वर्षांखालील वयाची मुले नोंदणी फॉर्म भरू शकतात, पण त्यांची उपयोगकर्ता माहिती आम्हाला पाठवली जात नाही आणि खाते निर्माण होत नाही. त्याऐवजी, ते Snapchat ला"Snapkidz" या स्वरूपात वापरू शकतात, ज्यामध्ये फोटो घेणें, कॅप्शन आखणे, चित्र काढणे आणि उपकरणामध्ये त्याला सुरक्षित करणें यांसाठी इंटरफेस असतो, पण त्यामध्ये फोटो पाठवणे किंवा प्राप्त करणे किंवा मित्रांना जोडणे याला समर्थन मिळत नाही. आम्ही याचे परीक्षण पहिले iOS वर करत आहोत आणि सगळेकाही व्यवस्थित राहिले, तर आम्हाला ते येणाऱ्या Android अपडेटमध्ये सामील करण्याची आशा करतो.

हे करत असतांनाच, आम्ही आमचे गोपनीयता धोरण अद्ययावत केले आहे. आम्ही आशा करतो की नवीन संस्करणामध्ये आमच्या कार्यपद्धतींबद्दल अधिक विस्तृत माहिती मिळेल. काळजी करू नका, आम्ही तुमच्या माहितीसह स्नॅप्स साठविणे आणि डिलीट करणे हे हाताळण्यासंबंधीचे आमचे धोरण बदललेले नाही.

आम्ही SnapKidz साठी खाते वापराच्या अटी आणि अद्ययावत होण्याची गरज असलेल्या काही इतर गोष्टींमध्ये सुधारणासुद्धा केली आहे. ते वाचण्यास व समजण्यास सोपे करत राहण्यासाठी आम्ही वेळोवेळी वापराच्या अटींमध्ये संशोधन करणार आहोत.

स्नॅपिंगसाठी शुभेच्छा!

Back To News