या आठवड्यात, भारतात स्नॅपचॅटर्सची वाढती कम्युनिटी आणि आम्ही निर्माण केलेली सशक्त भागीदारी साजरी करण्यासाठी आभासी समारंभ केला आहे.
अगदी जगभरात तुम्ही कुठेही असलात, तरी Snapchat सांस्कृतिकदृष्टया संबंधित वाटायला हवे यावर आमचा ठाम विश्वास आहे. भाषांपासून कंटेंटपर्यंत, AR चे क्रिएटर्स, आमच्या टीमने तुम्हाला अनुभव देण्यासाठी मागील वर्षी खूपच कष्ट घेतले आहेत, ज्यांना आपला भारतीय समुदाय स्वीकारेल.
आभासी समारंभामध्ये, आम्ही आमच्यामध्ये सामावलेल्या भागीदारांचे अद्भूत काम हायलाइट केले आहे आणि काही नवोदितांबद्दल उत्साही बातम्या शेअर केल्या आहेत.
डिस्कव्हर फ्रंटमध्ये, आम्ही स्नॅपच्या मूळ सीरीज, फोन स्वॅपचे हिंदी भाषेत रूपांतर करत आहोत आणि अनुष्का सेन, रफ्तार, रूही सिंग आणि वीर दाससारख्या सेलिब्रेटीजचे नवीन विशेष शोज प्रसारित करणार आहोत. हे कार्यक्रम 2021 मध्ये येणार आहेत.
आम्ही आमच्या पहिल्या भारतीय स्नॅप गेम्सचे भागीदार, मूनफ्रॉग लॅबजचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत, जे प्रत्येकाला माहीत असलेल्या आणि आवडत्या खेळाची सानुकूल आवृत्ती तयार करतो - लुडो क्लब. आम्ही आमच्या लोकप्रिय गेम रेडी शेफ गोवर भारतीय स्वयंपाकघरातील आव्हान ‘डोसा डॅश’ जोडण्यासाठी मोझीवर्क्स येथील टीम बरोबर देखील कार्यरत आहोत!
अखेरीस, NDTV आणि Alt Balaji यांच्यासह स्नॅप कीटच्या एकत्रिकरणांसह,ब्रेकिंग न्यूजपासून स्नॅपचॅटर्स पहात असलेले सगळे कार्यक्रम, किंमत तुलना माहिती आणि अगदी ट्रेनने देशात प्रवास करत असताना येण्याच्या अचूक वेळा शेअर करू शकतील!
मागील वर्षात सुमारे 150% सक्रिय दैनंदिन वापरकर्त्यांमध्ये वाढ झालेली आहे*, ही केवळ एक सुरुवात आहे. एकत्र करण्यासाठी आमच्याबरोबर असलेल्या सगळ्या सर्जनशील भागीदारांचे आम्ही आभार मानू इच्छितो,आम्हाला आशा आहे की आमचा समुदाय या नवीन वैशिष्ट्यांचा आणि अनुभवांचा आनंद घेईल.
* Snap Inc अंतर्गत डेटा, Q3 2019 विरुद्ध Q3 2020