आज, आपण जसे आपल्या मित्रांबरोबर बोलतो तसे संवर्धित वास्तव बदलते आहे. एक दशलक्ष पेक्षा जास्त लेन्सेस स्नॅपचॅटमध्ये आहेत, आणि ७५% पेक्षा जास्त सक्रिय वापरकर्ते रोज AR च्या माध्यमातून संवाद साधतात. पण, आम्ही भविष्याची कल्पना करतो जिथे आपण AR वापरून आपले जग पूर्णपणे नवीन दृष्टिकोनातून बघतो आहोत.
मागील वर्षी आम्ही लँडमार्कर्सची ओळख करून दिलेली होती, ज्यामध्ये स्नॅपचॅटचा कॅमेरे वैयक्तिक इमारतींची जागा समजून घेण्यासाठी सक्षम होते आणि जगातील काही सर्वोत्तम लॅन्डमार्कर्स बरोबर संवाद साधण्यासाठी लेन्सेसना परवानगी दिलेली होती. बकिंगहॅम पॅलेस पासून, ते न्यूयॉर्क मधील फ्लातिरों बिल्डिंग , ताजमहाल पर्यंत, या सगळ्या जागा जगातील सर्वात कलात्मक माणसांच्या संपूर्ण नवीन दृष्टिकोनामधून आपल्या जीवनाशी निगडित होत आहेत, आपले डिजिटल आणि भौतिक आयुष्याला जवळून आकार देत आहेत.
आज आम्ही लोकल लेन्सेस बाबत एक पुढचे पाऊल टाकले आहे, ज्यामध्ये ह्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे आणि शहरामधील अवरोधित जागांसह, मोठ्या जागा संवर्धित करणे शक्य झाले आहे. ३६०-अंशाच्या इमेजेस मधून आणि समुदायाच्या स्नॅप्समधून माहिती घेऊन, भौतिक जगाचे डिजिटल प्रतीकात्मक स्वरूप तयार करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, आणि वेगळ्या दृश्यांच्या माध्यमातून संवर्षीत अनुभव पाहण्यासाठी तयार आहोत. ३D पुनर्रचना, मशीनच्या माध्यमांतून शिकणे आणि विखुरलेल्या जागा मोजून, आम्ही आता संपूर्ण शहराचा नकाशा पाहू शकतो.
या आठवड्यामध्ये, कार्नबी स्ट्रीट लंडन येथे सिटी पेंटर ही आमची पहिली लोकल लेन्स तुम्हाला मिळू शकते. स्नॅपचॅटर्स प्रचारामध्ये सहभागी होऊ शकतात, भौतिक जगाचाही वरती काही असणारे AR जग शेअर करू शकतात,आणि त्यांच्या आजूबाजूच्या जागा रंगांनी भरून टाकण्यासाठी सहयोग करू शकतात. ज्यावेळेस तुम्ही जवळ पोहोचाल तेव्हा स्नॅप मॅपवर तुम्ही आयकॉन पहा. आम्हाला माहित आहे की, सुंदर रंगीत जग एकमेकांच्या मदतीने निर्माण करण्याचा तुम्ही आनंद घ्याल.