२८ जून, २०१७
२८ जून, २०१७

तुमच्या फोनवरून एक कस्टम जिओफिल्टर डिझाइन करा

दररोज, स्नॅपचॅटर त्यांच्या साखरपुड्यासाठी आणि लग्नासाठी, पार्ट्या, सुट्ट्या, पदवीदान समारंभ आणि बरेच काही यासाठी हजारो जिओफिल्टर डिझाइन सबमिट करतात.

आजपासून, आम्ही एक कस्टम Snapchat फिल्टर डिझाइन करणे सोपे करत आहोत! स्नॅपचॅटर आता थेट Snapchat ॲपमध्ये फिल्टर तयार करू शकतात आणि Snaps सजवण्यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक सर्जनशील साधनांसह त्यांना कस्टमाइझ करू शकतात!