दररोज लक्षावधी लोक Snap Map चे वापर करून आपल्या मित्रांना भेट देतात आणि जगभरात आल्हाददायक घटनाही पाहतात. आज आम्ही एक्सप्लोर सादर करीत आहोत - तुमच्या Snap Mapवर काय घडत आहे, यासाठीचा प्र्वास मार्गदर्शक! सुरू करण्यासाठी फक्त 'न्यू अपडेट्स' वर टॅप करा.
जेव्हा मित्र रोड ट्रिपला निघतात, विमानाने एखाद्या नवीन ठिकाणी जातात किंवा दुसरे काही- जसे की प्रसिद्ध स्थळाला भेट देणे किंवा मोठ्या उत्सवात सामील होणे, एक्सप्लोरचे अपडेट्स आपोआप दिसून येतात. एका टॅपने, तुम्ही एक नवीन संवाद सुरू करू शकता. तुम्हाला ब्रेकिंग न्यूझ, कार्यक्रम आणि ट्रेंड(कल) पाहायची इच्छा असल्यास, अशा क्षणांसाठीही तुम्हाला अप्डेट्स मिळू शकतात.
एक्सप्लोर केवळ Snap Mapवर आपले ठिकाण सामायिक करत असलेल्या मित्रांकडून मिळणाऱ्या अप्डेट्स समाविष्ट करतो. Snap Mapवर आपले ठिकाण सामायिक करणें ऐच्छिक आहे- म्हणून तुम्ही Snap Mapला पहिले कधी भेट दिलेली नसल्यास किंवा घोस्ट मोडमध्ये आज असल्यास, तुमचे मित्र तुमचे ठिकाण पाहू शकणार नाहीत.
पुढील काही आठवड्यांमध्ये एक्सप्लोर जगभरात स्नॅप्चर्टर्ससाठी बाजारात येईल.
एक्सप्लोरिंगसाठी शुभेच्छा!