२५ जून, २०१९
२५ जून, २०१९

Celebrating Friendship with the Friendship Report

Today, we're releasing a global study of 10,000 people across Australia, France, Germany, India, Malaysia, Saudi Arabia, UAE, U.K., and the U.S. to explore how culture, age, and technology shape preferences and attitudes around friendship.

आज,आम्ही संस्कृती, वय आणि टेक्नॉलॉजि आवडी निवडी बदलण्याचे काम आणि मैत्रीबद्दलचे दृष्टिकोन कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, भारत, मलेशिया, सौदी अरेबिया, यु.ए.ई , यु.के, आणि युनायटेड स्टेट्स या देशांतील दहा हजार लोकांचा जागतिक अभ्यास प्रदर्शित करत आहोत. संपूर्ण जगातील मैत्रीवर दहा तज्ञांनी अहवालासाठी संदर्भ माहिती देऊन योगदान दिले आहे.

स्नॅप Inc. हेड ऑफ कन्झ्युमर इन्साईट्स, अमी मौसावी म्हणले, "स्नॅपचॅट हे तुमच्या खऱ्या मित्रांसोबत स्वतःच्या भावना आणि दृढ नातेसंबंध सक्षम करण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून तयार झाले,ज्यामुळे मैत्री मधली गुंतागुंत आणि संस्कृती मधले फरक यामधे आम्हाला आवड निर्माण झाली आहे" "जेव्हा मैत्री संपूर्ण जगात खूप वेगळी दिसते, आम्हाला माहित आहे की, हे आमच्या आनंदात मध्यवर्ती भूमिका बजावतात आणि हे स्नॅपचॅटद्वारे नवीन मार्ग शोधून मैत्री साजरी करण्यासाठी आणि उन्नत करण्यासाठी आम्ही मनापासून वचनबद्ध आहोत"

सर्वेक्षणानुसार संपूर्ण बाजारपेठेमध्ये, लोकांचे सरासरी सामाजिक वर्तुळामध्ये 4.3 खास मित्र असतात, 7.2 चांगले मित्र असतात आणि 20.4 ओळखीचे असतात. जगामध्ये, सरासरी 21व्या वर्षात पदार्पण केलेले लोक त्यांच्या आयुष्यभरासाठीच्या सर्वोत्तम मित्रांना भेटतात. असे प्रतिवाद नोंदवले गेले आहेत की, एका सर्वोत्तम मित्राचे "प्रामाणिकपणा" आणि "सत्यता" हे खूप महत्वाचे गुण आहेत आणि "मोठे सामाजिक वर्तुळ असणे" हे मित्र बनवताना खूप कमी महत्वाचे असते.

फ्रेंडशिप रिपोर्ट मध्ये मैत्रीच्या स्वरूपावर नवीन प्रकाश पडला आहे, यामध्ये:

  • वेगवेगळी संस्कृतीतील मैत्रीच्या व्याख्या मैत्रीचे वर्तुळ आणि मूल्यांवर कशा प्रभाव पाडतात.

  • मैत्री आनंदाशी कशी जोडली जाते, पण आपण मित्रांशी बोलताना आपण काय शेअर करतो आणि आपल्याला काय वाटते याचे बारकावे आपल्या सामाजिक वर्तुळाचा आकार, लिंग, पिढी आणि बरेच काही यावर आधारित असू शकते.

  • ज्या पिढीमध्ये आपण जन्माला येतो ती आपल्या मैत्रीबद्दलच्या दृष्टिकोनावर खूप प्रभाव पडते - आणि जनरेशन झेड ही त्यांच्या हजारो इच्छांपासून दूर राहून खूप दूरवर पसरलेल्या छोट्या गटाच्या जवळीक आणि सलगीसाठी स्वतःला समायोजित करीत आहे.

थेरपिस्ट आणि मैत्रीचा अभ्यास करणारे, मिरिअम किरमयेर म्हणाले, "मैत्री आणि बाकीच्या नात्यांमध्ये फरक सांगणारी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ती ऎश्चिक असते." “आमचे कुटुंब,भागीदार आणि लहान मुले यांच्याशी असलेल्या नात्यांव्यतिरिक्त,आपल्या मित्रांच्या बाबतीत आपली अशी अपेक्षा नसते की आपण एकमेकांच्या जीवनात सहभागी व्हावे. आपण आपल्या मैत्रीमध्ये गुंतवणूक करणे हे आपण सतत निवडत असतो— दाखवण्यासाठी आणि गुंतून राहण्यासाठी. आपल्या आनंदासाठी आणि आत्मसन्मानासाठी ही एक बिनतक्रार केलेली निवड आहे जी आपल्या मैत्रीवर खूप प्रभाव पडते."

या जागतिक सर्वेक्षणामधून मिळवलेल्या अंतर्दृष्टीच्या नमुन्यांमध्ये यांचा समावेश आहे:

सांस्कृतिक परिणाम

  • भारत, मध्य पूर्व आणि दक्षिणपूर्व आशिया मध्ये युरोपिअन देश, युनायटेड स्टेट्स आणि ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत तिपटीने खास मित्र असल्याची लोकांची नोंद आहे. यु.केमध्ये 2.6 सर्वात कमी तर, सौदी अरेबियामध्ये सर्वात जास्त सरासरी 6.6 इतके खास मित्र आहेत. युनायटेड स्टेट्समधील लोकांचा खास मित्रांच्या सरासरीमध्ये 3.1 ला दुसरा सर्वात कमी क्रमांक आहे आणि आणि इतर देशांपेक्षा फक्त एकच जिवलग मित्र असल्याची नोंद आहे.

  • "हुषार आणि सुसंकृत"असा मित्र असणे हे भारत, मध्य पूर्व आणि दक्षिणपूर्व आशिया या देशांमध्ये याला सर्वात जास्त मूल्य आहे तर "सुज्ञता-नसलेला"असणे ही बाब युनायटेड स्टेट्स, युरोप आणि ऑस्ट्रेलिया मध्ये जास्त आहे.

  • इतर धर्म जे म्हणतात, "खूप मोठे सामाजिक वर्तुळ"असणे हे चांगला मित्र असण्यासाठी खूप गरजेची बाब आहे यापेक्षा भारत, मध्य पूर्व आंणि दक्षिण आशिया मधील हे चौपटीने जास्त आहेत. खरं तर, जगातील सरासरी नुसार, "खूप मोठे सामाजिक वर्तुळ असणे" हे सर्वात चांगले मित्र शोधण्याचा सर्वात कमी महत्त्वाचा गुण असतो.

मैत्रीचे वर्तुळ आणि संवाद

  • जगामध्ये, 88% लोकांना त्यांच्या मित्रांसोबत ऑनलाईन बोलायला जास्त आवडते. ऑनलाईन संवादामध्ये त्यांना काय आवडत आणि त्याच्या फायद्यातील करारांबद्दल समजावून सांगण्यासाठी आपले प्रतिवादी हे विविध पर्याय निवडू शकत होते. सर्व प्रदेशांमध्ये, 32% लोकांनी त्यांच्या "मित्रांसोबत त्यांचे सर्वात जलद आणि सहज बोलणे" हे त्यांचे आवडते स्पष्टीकरण म्हणून निवडले आहे.

  • वैयक्तिक किंवा ऑनलाईन मित्रांशी बोलतांना, आम्हाला "आनंद", "प्रेम" आणि "आधार" अशा तीन जगभरात सर्वात जास्त नोंदविल्या गेलेल्या आणि भारावून जाण्याएवढी सकारात्मक भावना जाणवते. तथापि, ऑनलाईन संवाद साधताना पुरुषांपेक्षा महिलांना सर्वात जास्त या भावना जाणवतात अशी नोंद आहे.

  • आपण पाहतो की जेव्हा मित्रांचे सरासरी प्रकार येतात तेव्हा सार्वजनिक व्यासपीठ वापरणाऱ्यांकडे खूप गटांच्या ओळखी असतात पण यांच्याकडे खाजगी संवाद साधणाऱ्यांपेक्षाही कमी खरे मित्र असतात. स्नॅपचॅट वापरणाऱ्यांकडे सर्वात जास्त "खरे मित्र" आणि "जवळचे मित्र" असतात, आणि "ओळखीचे" कमी असतात. तसेच फेसबुक वापरणाऱ्यांकडे कमी "खरे मित्र" असतात, आणि इंस्टाग्राम वापरणाऱ्याकडे सर्वात जास्त "ओळखीचे" लोक असतात.

पिढीचा प्रभाव

  • जगात, जनरेशन झेड(किशोरवयीन) आणि तरुण यांच्यामध्ये मित्रांसोबत ऑनलाइन बोलण्याच्या आवडीमध्ये आश्चर्यकारक गोष्टी स्पष्ट आहेत - Gen X च्या 13% आणि 26% बेबी बूमर्सच्या तुलनेत अनुक्रमे केवळ 7% आणि 6% म्हणाले की, ते आनंद घेत नाहीत. तरुण पिढ्या दृश्य संवादामध्येही मूल्य पाहतात — 61% लोकांचा विश्वास आहे की, जे ते शब्दांमध्ये बोलू शकत नाहीत ते व्यक्त करण्यास व्हिडिओ आणि फोटो जास्त मदत करतात.

  • जगातील तरुण पिढी सर्वात जास्त "आनंदी शेअर" करण्यासाठी पुढे आहे असे संपूर्ण संशोधनामधून समोर आले आहे. सर्व प्रकारच्या सर्वेक्षणानुसार नुसार तरुण पिढी "मी हे शेअर करणार नाही" असं खूप कमी वेळा बोलतात. तरुण पिढी ही बाकीच्या पिढ्यांपेक्षा जास्त इंस्टाग्राम किंवा फेसबुक सार्वजनिक व्यासपीठांद्वारे सुद्धा त्यांचा मुद्दा मांडू शकतात. याशिवाय, त्यांना सर्वात जास्त खरे मित्र हवे असतात ज्यांच्याकडे सर्वाधिक सोशल नेटवर्क आहे. तरुण पिढीला बाकीच्या पिढ्यांपेक्षा जास्त "जेवढे शक्य होतील तितके मित्र " हवे असतात.

  • जनरेशन झेड हे तरुण पिढीच्या पाऊलखुणांवर चालताना दिसत नाही, उलट ते त्यांच्या मैत्रीमध्ये जवळीक साधत असतात आणि इतर पिढीपेक्षा मोकळे आणि प्रामाणिक संबंध शोधत असतात.

  • वयस्कर व्यक्ती त्यांच्या खऱ्या मित्रांसोबत जी चर्चा करतात त्यात विनम्र राहून जास्त पुराणमतवादी असतात,आणि तरुण मुले त्यांच्यासमोर पुन्हा विरोधाभासी होतात. एक तृतीयांश पेक्षा जास्त वयस्कर असे म्हणतात की, ते त्यांच्या खऱ्या मित्रांसोबत त्यांचे प्रेम जीवन (45%), मानसिक आरोग्य (40%) किंवा पैशाची चिंता (39%) बद्दल अजिबात बोलत नाहीत. अनुक्रमे फक्त 16%, 21% आणि 23% तरुण हे त्यांच्या खऱ्या मित्रांना या सारख्या विषयाबद्दल बोलत नाहीत.

स्नॅप ग्लोबल फ्रेंडशिप रिपोर्ट संपूर्ण वाचण्यासाठी, येथे किल्क करा.

रिपोर्टबद्दल

प्रोटीन एजन्सीच्या भागीदारीत सुरू झालेल्या फ्रेंडशिप रिपोर्टमध्ये ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, भारत, मलेशिया, सौदी अरेबिया, UAE, आणि U.K. आणि युनायटेड स्टेट्स मधील 13 ते 75 वयोगटातील 10,000 राष्ट्रीय प्रतिनिधी लोकांना मतदान केले. युनायटेड स्टेट्समध्ये 2,004 प्रतिवाद्यांनी एप्रिल 2019 मध्ये सर्वेक्षणामध्ये भाग घेतला. प्रतिवादी हे स्नॅपचॅटच्या वापरासाठी निवडलेले नाहीत आणि ते ग्राहकांचे संयोगिक नमुने होते; ते जनरेशन झेड,तरुण, जनरेशन X आणि बेबी बुमर असे चार मुख्य पिढीमध्ये विभागले गेले आणि त्यांच्या मैत्री वरील विचारांवर सर्वेक्षण केले गेले. तंत्रज्ञानाचा आपल्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांवर प्रकाश टाकताना, मित्र जगामध्ये आणि पिढी मध्ये कसे संवाद साधतात यावर फ्रेंडशिप रिपोर्टमध्ये नवीन शोध उघड केला आहे.

Back To News