जेव्हा काहीतरी घडते त्यावेळेस स्नॅपचॅटर्स सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या हातातील स्क्रीन सुरु करतात. यावर्षी १२५ लक्ष पेक्षा अधिक लोकांनी बातम्यांसाठी स्नॅप स्टोरीज पाहिलेली आहे* आणि U.S Gen Z लोकसंख्येच्या अर्ध्या पेक्षा अधिक जनता बातम्यांसाठी डिस्कव्हर बघते.**
आमच्या समुदायाप्रती आमची जबाबदारी आहे यावर आमचा नेहमीच विश्वास राहिलेला आहे, आणि त्यासाठीच Snapchat एक सर्वांसाठी खुले नसलेले व्यासपीठ आहे जे काही निवडक भागीदारांच्या गटाबरोबर मोबाईलसाठी विश्वासार्ह माहिती निर्माण करण्याचे नवीन मार्ग तयार करतो.
आम्ही हॅपनिंग नाऊ ची ओळख करून देत आहोत: प्रत्येक मिनिटाला जगामध्ये काय घडत आहे हे कोणत्याही क्षणी जाणून घेण्यासाठी स्नॅपचॅटर्ससाठी हा सगळ्यात गतिमान मार्ग आहे.
आम्ही काही महत्वाच्या आणि विश्वासार्ह बातमी देणाऱ्या संस्थांबरोबर भागीदारी केलेली आहे, ज्यामध्ये द वॉशिंग्टन पोस्ट, ब्लूमबर्ग, राऊटर्स, NBC न्यूज, ESPN, नाऊ धिस, E या संस्थांचा समावेश आहे! न्यूज, डेली मेल, बझफीड न्यूस आणि इतर अनेक संस्था राजकीय क्षेत्रामधील मोठ्या घडामोडी , मनोरंजन, खेळ आणि इतर अनेक बातम्या फक्त एका स्नॅप्समध्ये दिसू शकतात - स्नॅपचॅटर्सना त्यांच्या मोबाईलवर गतीने आणि सारख्या ब्रेकिंग न्यूज बघता याव्यात यासाठी हे नवीन स्वरूप बनविण्यात आले आहे.
आपल्या बिटमोजीच्या वैशिष्ट्यपूर्ण वापराने तुम्ही रोज तुमचे भविष्य आणि वैयक्तिक हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी सक्षम होऊ शकता.
हॅपनींग नाऊमध्ये दाखविण्यासाठी आमचा संपादकीय गट आमच्या समुदायाने निवडलेले सार्वजनिकरित्या शेअर झालेले स्नॅप्स खास राखून ठेवणार आहेत.
आजपासून हॅपनींग नाऊ हे अमेरिकेमध्ये सगळ्यांसाठी उपलब्ध असेल, आणि पुढील वर्षभरात जगामधील इतरही बाजारपेठांची हे उपलब्ध व्हावे असे पाहत आहोत.
*Snap Inc. आंतरिक डेटा जानेवारी- एप्रिल 2020
** Snap Inc. आंतरिक डेटा Q1 2020. १३ ते २४ वायोगटातील वापरकर्ते अशी Gen Z व्याख्या आहे. अमेरिकेमधील लोकसंख्येच्या आकड्यांचा आधार अमेरिकेमधील Gen Z लोकसंख्या मोजण्यासाठी केला आहे.