फक्त अक्षरांमधून मेसेज पाठवण्यापेक्षा तुमच्या खऱ्या मित्रांबरोबर फोटो आणि व्हिडिओमधून गप्पा मारण्यात खरी गमंत आहे या विश्वासावर Snapchat बनविले गेले आहे. जवळच्या मित्रांना मोकळेपणाने आणि कलात्मकरित्या व्यक्त होण्यासाठी आणि ते ही सुरक्षितपणे या मूळ तत्त्वांपासून आम्ही आमच्या या प्रगतीच्या काळातही दूर गेलो नाही.
गोपनीयता, सुरक्षा आणि आपल्या समुदायाचे कल्याण सुनिश्चित करणे हे आमच्या मुल्यांमध्ये आणि उत्पादनांच्या तत्त्वज्ञानावर खोलवर रुजलेले आहे. सुरक्षेचे मूळ तत्त्व घेऊन Snapchat तयार व्हायला सुरुवात झाली —क्षणभंगुरतेपासून सुरुवात झाली — आणि इतरांच्या मतांचे ओझे न घेता मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी हे डिझाईन केले आहे. उदाहरणार्थ, आम्ही एखादे नवीन प्रॉडक्ट आणि वैशिष्ट्य बनविताना गुप्तता -सुरक्षा- अशा हा मूळ दृष्टिकोन ठेऊन बनवतो, आम्ही स्नॅपचॅटर्सचा डेटा काळजी आणि संवेदनशीलतेने हाताळतो आणि चुकीच्या, खोट्या बातम्या या प्लॅटफॉर्मवरून पसरू नयेत याकरिता आम्ही स्वयंप्रेरणेने सक्रियतेने काम करतो.
यामधून जबाबदारीची जाणीव दिसून येते आणि आमचा हा प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर सकारात्मक ठसा उमटवल्याचा आनंद मिळतो. आजच्या सुरक्षित इंटरनेट दिवसाच्या सन्मानार्थ, सुरक्षेची ही जबाबदारी पुढे नेण्यासाठी आम्ही काही नवीन साधनांची घोषणा करीत आहोत. Here For You हे ॲपमधील नवीन वैशिष्ट्य आम्ही सुरू करीत आहोत, ज्या स्नॅपचॅटर्सना मानसिक स्वास्थ्य किंवा भावनिक पेचप्रसंगांचा अनुभव आलेला असेल, किंवा जे याविषयांबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी आणि आपल्या मित्रांना याविषयी मदत करण्यासाठी उत्सुक असतील त्यांच्यासाठी आम्ही स्वयंप्रेरणेने हे सुरू केलेले आहे.
Here For You हे या महिन्यापासून वापरात येणार आहे, जेव्हा स्नॅपचॅटर्स मानसिक आरोग्य, चिंता, नैराश्य, तणाव, आत्महत्येचे विचार, दुःख, छळवणूक अशा विषयांबद्दल सर्च करतील, त्यावेळेस आम्ही तुमच्या जवळपास असलेल्या तज्ज्ञांची माहिती दाखवू.
आज स्नॅपचॅटर्स आमची काही कलात्मक साधनं आणि लेन्सेस, ज्यामध्ये नवीन फिल्टर्स, आणि पहिल्यांदाच स्नपेबल्स क्विझ यांचा समावेश असून सुरक्षा आणि गोपनीयता या महत्वाच्या गोष्टी यामध्ये आहेत.
इंटरनेट सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने हे नवीन फिल्टर्स आणि क्विझ वापरावे यासाठी आम्ही सगळ्या स्नॅपचॅटर्सना प्रोत्साहन देतो.