तुम्ही आणि तुमचे मित्र ह्या जगाकडे ज्याप्रकारे पाहतात त्या पद्धतीची Snapchat ने नेहमीच वाखाणणी केली आहे. स्नॅप्स, स्टोरीज आणि आमच्या स्टोरीज मधून भिन्न दृष्टीकोन अनुभवणे मजेदार आहे.
आज आम्ही सादर करत आहोत डिस्कव्हर.
Snapchat डिस्कव्हर हा विविध संपादकीय टीममधून स्टोरीज शोधण्याचा एक नवीन प्रकार आहे. मीडिया मधील जागतिक स्तरावरील नेत्यांच्या सहकार्याने तयार झालेली ही अशी एक रूपरेषा आहे जी कथेला प्रथम स्थान देते. हे सोशल मीडिया नाही.
ताज्या घटना किंवा सध्या काय लोकप्रिय आहे ह्यावर आधारित काय वाचावे हे सोशल मीडिया कंपन्या आम्हाला सांगतात. आम्ही याला वेगळ्या प्रकारे पाहतो. काय महत्त्वाचे आहे ते ठरवण्यासाठी आम्ही क्लिक्स आणि शेअर्सवर नव्हे तर संपादक आणि कलाकारांवर अवलंबून असतो.
डिस्कव्हर वेगळे आहे कारण ते कलात्मक वापरासाठी बनवलेले आहे. बऱ्याचदा कलाकारांना त्यांचे काम वितरित करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाशी जमवून घ्यावे लागते. यावेळी असे तंत्रज्ञान आम्ही तयार केले जे कलेची सेवा करेल: प्रत्येक आवृत्तीत पूर्ण स्क्रीन फोटो आणि व्हिडिओ, लांब फॉर्म लेआउट आणि अप्रतिम जाहिराती समाविष्ट आहेत.
डिस्कव्हर नवीन आहे, पण परिचित आहे कारण स्टोरीज महत्त्वाच्या आहेत - त्यांना एक सुरुवात, मध्य आणि शेवट आहे ज्यामुळे संपादक त्यात प्रत्येक गोष्ट बसवू शकतील. प्रत्येक आवृत्ती 24 तासांनंतर रीफ्रेश होते - कारण आज जी बातमी आहे ती उद्या इतिहास आहे.
डिस्कव्हर वापरण्यास मजेदार आणि सोपे आहे. एखादी आवृत्ती उघडण्यासाठी टॅप करा, स्नॅप्स बघण्यासाठी डावीकडे स्वाइप करा किंवा अधिकसाठी स्नॅपवर वरच्या दिशेला स्वाइप करा. प्रत्येक चॅनेल आपल्यासाठी काहीतरी अद्वितीय आणते - रोज एक विस्मयकारक आश्चर्य!