आम्ही चॅट अशा तऱ्हेने डिझाईन केले आहे तुम्हाला वाटेल जणू काही तुम्ही एकत्र कट्ट्यावर बसून गप्पा मारताय.जेव्हा तुमचा एखादा मित्र चॅट करायला सुरुवात करेल तेव्हा बिटमोजी त्याच्या समोर प्रकट होऊन त्याला म्हणेल "मी आलोय!" आणि तुमच्या सर्व गप्पा कायमस्वरूपी सेव्ह का नाही होऊ शकत, बाय डिफॉल्ट.
आता आम्ही चॅट करणे अजून मनोरंजक केले आहे. आता तुम्ही एकाच वेळी तुमच्या 16 मित्रांशी व्हिडीओ चॅट करू शकता. आपल्या मित्रांना एकत्र आणण्यासाठी ग्रुप चॅट वर असलेल्या व्हिडीओ कॅमेरा आयकॉन वर टॅप करा! ग्रुप चॅट वर असलेल्या मित्रांना जॉईन होण्यासाठी सूचित केले जाईल.
त्यांच्याशी कसा संवाद साधायचा हे तुमच्या हातात आहे. लेन्सेस वापरा, व्हिडीओ न वापरता फक्त गप्पा मारा, किंवा मेसेजेस पाठवा जे तुमच्या मित्रांना ते इतरांशी बोलता बोलता वाचता येतील. प्रत्येक संभाषण वेगळा अनुभव देणारे असेल!
जगभरातील सर्व स्नॅपचॅटर्सना या आठवड्या पासून ग्रुप व्हिडीओ चॅट सुविधा वापरता येईल.
हॅपी चॅटिंग!