स्नॅपचॅट हे नेहमीच तुमची मते मांडण्यासाठी आहे. म्हणूनच तर आमचे ॲप्लिकेशन थेट कॅमेऱ्यामध्ये सुरु होते. आपल्या मित्रांसोबत छोटे छोटे क्षण शेअर करण्याचे सर्वात वेगवान साधन आहे- जेणेकरून त्यांना तुम्ही कुठे आहात आणि सध्या तुमच्या काय भावना आहेत हे समजते.
जेव्हा आम्ही My Story घेऊन आलो तेव्हा आम्ही कल्पना देखील केली नव्हती की ते तुमच्या क्षणांना एकत्र करण्यासाठी एवढे उपयुक्त असेल. आमच्या मित्रांना आमच्या आयुष्यातील घडामोडी सांगणे आम्हाला खूप आवडते.
तरीही My Story नेहमीच वैयक्तिक अनुभव सादर करण्याचे साधन आहे. एखाद्या समुदायाचे मत प्रदर्शित करणारे काहीतरी तयार करायचे आमच्या मनात होते – त्यावर आमचे अनेक वेगवेगळे दृष्टिकोन होते. शेवटी, आमचे मित्र वारंवार एक गोष्ट पूर्णतः वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात.
आम्ही Our Story ची निर्मिती केली की ज्यामुळे, जे स्नॅपचॅटर्स एकाच ठिकाणी आहेत ते तुमच्या त्याच स्टोरी मध्ये स्नॅप देऊ शकतात. जरी तुम्ही त्या समारंभाला उपस्थित राहू शकला नाहीत तरी Our Story पाहून तुम्ही तिथे असल्याचा अनुभव तुम्हाला घेता येईल. ते वापरायला खूप सोपे आहे.
या आठवड्याच्या शेवटी Our Story आम्ही पहिल्यांदाच Electric Daisy Carnival मध्ये सादर करत आहोत (इथे स्नॅपचॅट आणि Insomniac साठी आम्ही मोफत WiFi सुविधा देखील देणार आहोत)
जर तुम्ही Electric Daisy Carnival ला जाणार असाल तर, तुमच्या “Send to…” या पेजवर असलेल्या “Our EDC Story” वर जा आणि तुमचे स्नॅप्स टाका. तुम्ही त्या कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थित आहात हे स्नॅपचॅटला दाखविण्यासाठी तुम्हाला लोकेशन सेवा सुरू ठेवावी लागेल. आम्ही तुमचे लोकेशन स्टोअर करत नाही.
जरी तुम्हाला Electric Daisy Carnival ला प्रत्यक्ष जाता आले नाही, तरी स्नॅप्सच्या सिरीजद्वारे इव्हेंट बघण्यासाठी EDCLive स्नॅपचॅटमध्ये सुरु करा! जर आम्हाला असे लक्षात आले की, Our Story अनावश्यक मोठी होत आहे किंवा त्यात काही अनधिकृत स्नॅप्स आहेत तर आम्ही EDCLive बनवू आणि तुम्हला शक्य तितका चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न करू.
Our Story आधीपासूच आपल्या फोनवर असलेल्या ॲप्लीकेशनचा भाग असल्याने - त्याला अपडेट करण्याची आवश्यकता नाही. स्नॅपिंगसाठी शुभेच्छा!