आठ वर्षांपूर्वी तुमच्या मित्रांशी बोलणे जलदआणि अधिक मजेदार करण्यासाठी आम्ही Snapchat बनवले आहे.
परंतु तुम्ही ज्या गोष्टी बोलता, त्यापेक्षा मैत्री खूप अधिक असते. मैत्री तुमच्या एकत्र घेतलेल्या अनुभवांबद्दल देखील असते, म्हणून मित्र एकत्र खेळण्यासाठी संपूर्ण नवीन अनुभव तयार करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करत आहोत.
स्नॅपगेम्स सादर करीत आहोत : मित्रांसाठी बनविलेला मोबाइल गेम!
तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना लगेच एकत्र खेळण्याची परवानगी देऊन तुम्ही चॅटबारवरुन थेट स्नॅप गेम सुरू करू शकता– इंस्टाल करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही पाहू शकता की तुम्ही कोणत्या मित्रांसोबत खेळत आहात, त्यांना चॅट पाठवू शकता किंवा व्हॉइस चॅटसह थेट गप्पा देखील मारू शकता. असे वाटते की तुम्ही खांद्याला खांदा लावून बसला आहोत, एकाच स्क्रीनवर खेळत आहात.
स्नॅप गेम्स सहा टायटल्स सह सुरू होत आहे:
Bitmoji पार्टी: तुम्हाला आणि तुमच्या मित्रांसाठी स्नॅपचे प्रमुख, फर्स्ट पार्टी IP फीचर, जे आयुष्याला पूल पार्टी, किक ऑफ, स्पिन सेशन आणि झोम्बी एस्केप यासारख्या जलद पण छोट्या खेळांमध्ये तुमच्या Bitmoji सारख्या तुम्हाला 3D स्पर्धेत आणतात.
अल्फाबेअर ह्युस्टल: (स्प्रे फॉक्स ) - अल्फाबेअर ह्युस्टल हा एक जलद सहकार्य करणारा आणि थोड्या कठीण गोष्टी असलेला शब्दांचा खेळ आहे. शब्द बनविण्यासाठी खेळाडू एकत्र खेळून, बेअर/अस्वलं जमा करून आणि त्यांचे स्वतःचे वैयक्तिक अस्वलांचे गाव (बेअर व्हिलेज) तयार करू शकतात.
C.A.T.S. (कॅश अरेना टर्बो स्टार्स) स्पर्धा पुढे नेणे: (झेप्टोलॅब ) - C.A.T.S हा एक अनेक खेळाडूंनी खेळावयाचा खेळ आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त 6 खेळाडूंचा समावेश करून ट्रॅकवर विखुरलेल्या बुस्टर्सची रेस जलद करू शकता किंवा प्रतिस्पर्ध्याची गती कमी करू शकता. आणि त्याचबरोबर, C.A.T.S युनिव्हर्समधून नवीन वाहने जमा करू शकता.
स्नेक स्क्वाड: (गेम क्लोजर) - स्नेक स्क्वाड हा अनेक खेळाडूंनी खेळावयाचा शाही युद्धाचा खेळ आहे. युद्धावर जाण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचा पोशाख निवडा आणि प्रतिस्पर्ध्याला ठरविण्यासाठी तुम्ही तुमच्या सैन्याबरोबर तुमच्या सापाला मोठं होण्यासाठी युद्धभूमीवर मार्गदर्शन करू शकता.
टायनी रॉयल: (झिंगा) - टायनी रॉयल हा ट्रेडमार्क असलेला पूर्णपणे मजा असलेला जलद गतीचा शाही युद्धाचा खेळ आहे — Snapchat च्या व्यासपीठासाठी एका उत्कृष्ट शाही युद्धाचा अनुभव घेण्यासाठी पुन्हा बनविला आहे. जो पर्यंत कोणतीही एक टीम किंवा एक खेळाडू शिल्लक रहात नाही, तोपर्यंत तुमच्या मित्रांबरोबर किंवा तुम्ही एकटे 2 मिनिटांच्या लूट आणि शूट राऊंडमध्ये तुमच्या विजयाच्या मार्गावर जाऊ शकता.
झॉम्बी रेस्क्यू सेना: (पीकपॉक) - सर्वात पुढे असलेल्या झॉम्बीचा सर्वनाश करण्यासाठी तुमच्या बरोबर असलेल्या झॉम्बी रेस्क्यू मित्रांबरोबर जोडी बनवून प्रवेश करू शकतात. वाचलेल्यांना हंग्री हॉर्ड्सपासून सोडावा आणि शक्य तितक्या वस्तू जमवा. परंतु जर तुम्ही सुरक्षेसाठीचे हेलीकॉप्टर गमावले, तर तुम्ही मागे राहू शकता!
स्नॅपसाठी आणि आमच्या खेळ बनविणाऱ्या भागीदारांसाठी स्नॅप गेम्स ही उत्पन्नाची संधी आहे. 2018 मध्ये Q3 मधील प्रकाशित केलेल्या स्वरूपाप्रमाणे ह्या प्लॅटफॉर्मवरवर स्नॅपच्या सहा सेकंदाच्या न वगळता येणाऱ्या व्हिडिओ जाहिराती फीचर केल्या जाणार आहेत.
येत्या काही महिन्यांमध्ये Snapchat समुदायाला सर्वोत्कृष्ट खेळांचा अनुभव घेता यावा याकरिता स्नॅप गेम्स हळूहळू वेगवेगळ्या शैली आणि शैलींमधील विकासक भागीदारांचा विस्तार करण्याचा विचार करीत आहे.
खेळ बंद करण्याबद्दल
गेम क्लोजर HTML5 अॅप्ससाठी तंत्रज्ञान बनवून आणि वितरित करून अधिकाधिक लोकांपर्यंत त्यांच्या स्वतःच्या लोकप्रिय एव्हरविंग,या मोहक आणि कल्पनारम्य अशा मित्रांबरोबर खेळायचा खेळ पोहोचविते. 2011 मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून गेम क्लोजरचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल कार्टर हे नेतृत्व करीत आहेत. गेम क्लोजर तंत्रज्ञानाचे हे व्यासपीठ लेखकांना सिद्ध केलेली साधने, वितरण, अनुकूलता आणि उच्च कार्यक्षमता असलेले मेसेंजर गेम्स उपलब्ध करून देते.
पिकपॉक बद्दल
मोबाइल, टॅबलेट आणि डेस्कटॉपमध्ये पिकपॉक हे दर्जेदार खेळ प्रकाशित करण्यात अग्रगण्य आहेत. ज्यांनी बनविले आहेत ते मुख्य , परवानाधारक आणि तृतीय-पक्षाने विकसित केलेल्या मालमत्तांच्या पोर्टफोलिओसह, पिकपॉक असे खेळ ग्राहकांना प्रदान करतो, ज्यामध्ये पिक-अप-प्ले-गेमप्ले, उच्च-गुणवत्तेची कला आणि मुबलक ऑडिओ डिझाइन आहेत, ज्या गोष्टी ग्राहकांना उच्च खेळ खेळण्याच्या समृद्ध अनुभव देतात. पिकपॉकने बारकाईने तपासलेले आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झालेले अनेक खेळ आणले आहेत, ज्यामध्ये लोकप्रिय अशा Flick Kick® ची मालिका, BAFTA नामांकित केलेला Super Monsters Ate My Condo™, Into the Dead®, Shatter® आणि बरेच खेळ आहेत. थोडासा वेळ काढा आणि पिकपॉकमधील खेळ खेळा.
Spry Fox बद्दल
Spry Fox ही 10 वर्षे जुनी कंपनी असून त्यामध्ये 18 लोकं काम करतात, त्यांनी 15 वेगवेगळे खेळ प्रक्षेपित केलेले आहेत, ज्यामध्ये पुरस्कारप्राप्त अल्फाबेअर गेम, ट्रिपल टाऊन आणि रेआलम ऑफ द मॅड गॉड असे खेळ असून नवनिर्मित आणि सामाजिक वर्तनाचे खेळ बनवून ते जगाला एक आनंदी ठिकाण बनवितात.
झेप्टोलॅबबद्दल
झेप्टोलॅब ही एक जागतिक दर्जाची कंपनी आहे, जी त्यांच्या खास गुणवत्तेनुसार नवनवीन आणि उत्कृष्ट तसेच मजेदार खेळ बनवते. त्यांचा 1.2 अब्ज लोकांनी डाउनलोड केलेल्या कट द रोप या खेळाच्या यशानंतर, कंपनीने किंग ऑफ थिव्ज आणि C.A.T.S.: कॅश अरेना टर्बो स्टार्स हे भव्य 200 दशलक्ष मोबाईल वर एकत्र डाउनलोड झालेले खेळ प्रदर्शित केले होते. 2017 साली, C.A.T.S. ला गुगल प्ले मध्ये गेम ऑफ द इअरचा पुरस्कार मिळाला होता आणि Apple अॅप स्टोअरमध्ये बेस्ट गेम्सच्या यादीत स्थान मिळाले होते.
झान्गबद्दल
2007 साली हा खेळ तयार केल्यानंतर, खेळाच्या माध्यमातून जगाला जवळ आणणे हे झान्गचे मुख्य उद्दिष्ट आहे. आजच्या तारखेपर्यंत 1 अब्जपेक्षा जास्त लोकं झान्गचे FarmVille™, Zynga Poker™, Words With Friends™, Hit it Rich हे खेळ मोबाईल आणि वेबवर खेळतात. ™ स्लॉट्स आणि सीएसआर रेसिंग™ झान्गचे हे खेळ Apple iOS, Google Android आणि Facebook अशा जागतिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. कंपनीचे मुख्य ऑफिस हे सॅन फ्रान्सिस्को आणि कॅलिफोर्नियामध्ये असून इतर ऑफिसेस ही अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, आयर्लंड, भारत, तुर्की आणि फिनलंड येथे आहेत.