आज आम्ही तुमच्या नात्यांच्या अवतीभोवती फिरणाऱ्या आणि केवळ तुमच्यासाठी वैयक्तिकरीत्या तयार केलेल्या - नवीन आणि सुधारित Snapchatची घोषणा करत आहोत!
आतापर्यंत, सोशल मिडियाने नेहमीच प्रकाशक आणि निर्माते यांच्याकडील कंटेंटसह तुमच्या मित्रांचे फोटो आणि व्हिडिओ मिसळले आहेत. व्यावसायिक कंटेंट निर्मात्यांदररम्यानच्या रेषेला पुसट करून तुमच्या मित्रांना इंटरनेटचा मनोरंजक अनुभव प्राप्त होत असताना, त्यातून काही विचित्र दुष्परिणामदेखील (अफवांसारखे) निर्माण झाले आहेत आणि त्यामुळे आम्हाला असे जाणवले की फक्त स्वतःला व्यक्त करण्याऐवजी आपण आपल्या मित्रांसाठीदेखील काही केले पाहिजे.
नवीन Snapchat सोशलला मिडियापासून वेगळे करते. याचाच अर्थ असा होतो की तुमच्या मित्रांकडून आलेल्या स्टोरीज आणि चॅट्स हे स्नॅपचॅटच्या डाव्या बाजूस असतील आणि प्रकाशक, निर्माते तसेच समुदायांतून येणाऱ्या स्टोरीज उजव्या बाजूस असतील.
Snapchat आणखी वैयक्तिकृत वाटावे यासाठी आम्ही आणखी नवीन काहीतरी शोधून काढले आहे: बदलते फ्रेंड्स पेज. कॅमेऱ्याच्या डावीकडे असलेले नवीन फ्रेंड्स पेज हे तुम्ही त्यांच्यासोबत कशाप्रकारे संवाद साधता यानुसार तुमचे मित्र दर्शविते.
तुम्ही असे म्हणू शकता की हा एक अधिक अत्याधुनिक सर्वोत्तम मित्रांसाठीचा अल्गोरिदम असून तो तुम्हाला ज्या मित्रांशी बोलायची इच्छा आहे त्यावेळी त्यांना शोधणे सुलभ करतो. आपल्या चॅट्समधून योग्य व्यक्तीला शोधण्यासाठी अविरतपणे स्क्रोलिंग करत राहण्याचा निराशाजनक अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे - आता तुमचे मित्र हे तुम्हाला त्यांच्यासोबत बोलण्याची असलेली इच्छा यानुसार सूचीमध्ये क्रमाने दिसतील. तुमचे मित्र सर्वोत्तमरित्या दर्शविण्यासाठी फ्रेंड्स पेजला काहीसा कालावधी लागू शकतो, पण त्याचे परिणाम तितकेच लायकही आहेत!
कॅमेऱ्याच्या उजव्या बाजूस असलेल्या नवीन डिस्कव्हर पेजवर प्रकाशक, निर्माते आणि समुदायातून येणाऱ्या स्टोरीज समाविष्ट असतील. तुमचे सबस्क्रिप्शन्स सर्वात वर येतात आणि मग त्यानंतर तुम्हाला पाहण्यात स्वारस्य वाटू शकतील अशा इतर स्टोरीज दिसतात. कालानुरूप, डिस्कव्हर हे तुमच्यासाठी एकमेव स्वरुपात वैयक्तिकृत होईल. डिस्कव्हरवरील स्टोरीज अल्गोरिदमनुसार वैयक्तिकृत होत असताना, आमचे क्युरेटर पेजवर प्रचारित होत असलेल्या सर्व गोष्टींचे पुनरावलोकन करून त्यांना मंजुरी देतात. आम्हाला विश्वास वाटतो की यांत्रिक वैयक्तिकीकरण आणि मानवी पुनरावलोकन यांचे साधलेले हे संतुलन मोबाईलवर सर्वोत्तम कंटेंट अनुभव प्रदान करते.
आणि नेहमीप्रमाणेच, Snapchat कॅमेरा उघडतो, ज्याद्वारे मित्रांसोबत एखादा क्षण अतिशय जलदपणे सामायिक करणे शक्य होते.
सोशलला मिडियापासून वेगळे करण्यामुळे आम्हाला मित्रांसोबत संवाद साधण्याचा सर्वोत्तम मार्ग आणि ज्या समस्यांमुळे इंटरनेट आज त्रस्त झाले आहे अशांना सोडवून उत्तम कंटेंट पाहण्याचा सर्वोत्तम मार्ग निर्माण करता आला आहे.
आम्हाला आशा वाटते की जितके बदल आम्ही केले आहेत त्यानुसार - हे एक संपूर्णपणे नवीन Snapchat आहे!
स्नॅपिंगसाठी शुभेच्छा!