मेमरी Snapchat वर Snaps आणि स्टोरीज सेव्ह करण्याची एक नवीन पद्धत आहे. हा आपल्या आवडत्या क्षणांचा वैयक्तिक संग्रह आहे जो कॅमेरा स्क्रीनच्या खाली असतो. मेमरी उघडण्यासाठी कॅमेर्यातून फक्त वर स्वाइप करा!
“कुत्रा” किंवा “हवाई” सारखे कीवर्ड टाइप करून आपल्याला हवे असणारे स्नॅप किंवा स्टोरी काही सेकंदातच शोधणे खूप सोपे आहे - अशा प्रकारे आपण शोधण्यात फार वेळ न दवडता आपल्या आठवणींचा आनंद घेण्यात अधिक वेळ घालवू शकता.
मेमरीज वापरून आपण घेतलेल्या स्नॅप्समधून नवीन स्टोरी तयार करू शकता किंवा भिन्न स्टोरीज एकत्रित करून एक मोठी कथा देखील बनवू शकता! काही जुने स्नॅप्स शोधून आणि त्यांना एका नवीन स्टोरीमध्ये एकत्र जोडून वर्धापनदिन किंवा वाढदिवस साजरा करणे मजेदार आहे :)
आपल्या मित्रांना मेमरीवरून स्नॅप पाठविण्यासाठी किंवा त्या आपल्या स्टोरीवर पोस्ट करण्यासाठी आम्ही एक नवीन मार्ग तयार केला आहे. जर आपण एका दिवसापूर्वी घेतलेला स्नॅप आपल्या स्टोरीमध्ये पोस्ट केला असेल तर त्याच्या भोवती एक फ्रेम दिसेल ज्यामुळे प्रत्येकाला कळेल की तो स्नॅप भूतकाळातील आहे.
आमच्या असे लक्षात आले स्नॅपचॅटर्स मित्रांसोबत असताना त्यांच्या मेमरीज दाखविण्यासाठी सोयीस्कर वाटू इच्छित आहेत, म्हणून आम्ही स्नॅप्स आणि स्टोरीज ह्या माय आईज ओन्ली ह्या सदरात हलविणे सोपे केले - जेणेकरून तुमच्या एखाद्या मित्राला तुमचा असा एखादा स्नॅप सापडू नये जो फक्त तुमच्या व्यक्तिगत वापरासाठी आहे.
मेमरीजच्या मागे Snapchat ची बांधणी आहे. आम्ही तुमच्या कॅमेरा रोलमधील कोणत्याही फोटो किंवा व्हिडिओ यांचा बॅकअप घेणार नाही जोपर्यंत तुम्ही तो नवीन स्टोरी बनविण्यासाठी वापरत नाही किंवा तो फक्त माझ्यासाठी ह्यात जोडत नाही. अशावेळी आम्ही फक्त आपण वापरलेल्या फोटो किंवा व्हिडीओचाच बॅक अप घेऊ.
आम्ही पुढच्या महिन्यात किंवा त्यापेक्षा थोड्या अधिक काळात मेमरीज आपल्या वापरासाठी सादर करू - आमच्या सेवांमध्ये हा एक मोठा बदल आहे म्हणून आम्ही प्रत्येक बाब सुरळीत असल्याचे सुनिश्चित करू इच्छितो! जेव्हा मेमरीज वापरण्यासाठी तयार असेल तेव्हा आपल्याला Snapchat टीमकडून चॅट मेसेज येईल.