Contributing to COVID-19 Relief

Today, to further support the global COVID-19 relief efforts, we're launching a new augmented reality donation experience, using Snapchat Lenses to bring awareness to the COVID-19 Solidarity Response Fund for the World Health Organization.
जागतिक कोविड -19 पँडेमिक सुरू असताना, Snapchat च्या तंत्रज्ञानामुळे मित्रांच्या संपर्कात राहणे, सार्वजनिक आरोग्याचे मार्गदर्शन जसजसे विकसित होते तसतसे सुरक्षिततेच्या शिष्टाचारांमध्ये जागरूकता आणणे आणि विश्वासू मीडिया प्रकाशकांद्वारे माहिती ठेवणे शक्य होते.
Snapchat Calling पासून Snap Camera पर्यंत, मित्र आवाज आणि व्हिडिओमार्फत जवळ राहतात. Snapchat चे कॉलिंग फिचर , सहसा AR अनुभवांसह वापरले जाते, फेब्रुवारीच्या उत्तरार्धाच्‍या तुलनेत मार्चच्या उत्तरार्धात 50% पेक्षा जास्त वाढले. *
कलात्मक साधनांच्या नवीन वैशिष्ट्यांसह, स्नॅपचॅटर्स तज्ज्ञांच्या मान्यताप्राप्त गोष्टी आपल्या स्नॅप्स मधून आणि आपल्या मित्रांबरोबर जलद गतीने शेअर करीत आहेत. आम्ही COVID-19 च्या ह्या काळात तीन नवीन लेन्सेस प्रदर्शित केल्या आहेत, ज्यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून प्रसारित झालेल्या माहितीबरोबर सुरक्षित राहण्यासाठी सांगण्यात आलेल्या काही गोष्टी जागतिक स्तरावरच्या लेन्समध्ये समाविष्ट आहेत. ह्या लेन्सेस जगभरात जवळपास 130 दशलक्ष स्नॅपचॅटर्सपर्यंत पोहोचल्या आहेत. **
आणि आज जागतिक कोविड -19 मदत प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड -19 एकता प्रतिसाद फंडामध्ये जागरुकता आणण्यासाठी Snapchat लेन्सेसचा वापर करून एक नवीन AR देणगीचा अनुभव देत आहोत.
Snapchat कॅमेऱ्यामधून, स्नॅपचॅटर्स 33 देशांमधील 23 आंतरराष्ट्रीय चलनी नोटा स्कॅन करू शकतात, COVID-19 चा प्रसाराचा मागोवा घेण्यासाठी जागतिक स्वास्थ्य संस्थेच्या तात्काळ परिश्रमाचे प्रतिसादांना ह्या देणग्या कशा आधार देतात याचे AR दृश्यण करते, रुग्णांना योग्य ती काळजी मिळते आहे याची खात्री करते आणि सर्वात पुढे असलेल्या कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या गोष्टी पुरवते. त्यानंतर स्नॅपचॅटर्स सहज देणगी देऊ शकतात आणि मित्रांना अनुभवाचे स्नॅप पाठवून तसे करण्यास प्रोत्साहित करू शकतात.
याव्यतिरिक्त, आमच्या डिस्कव्हर या व्यासपीठावर कोविड-19 कव्‍हर करणारे मीडिया प्रकाशक स्नॅपचॅटर्सना त्यांच्या सामग्रीमधून थेट देणगी देण्यासाठी स्वाइप करण्याचा पर्याय देतील. आजपर्यंत,COVID-19 वर 445 हून अधिक डिस्कव्हर स्टोरीज किंवा कार्यक्रम निर्माण केले गेले आहेत, आणि 68 मिलियनहून अधिक जागतिक स्नॅपचॅटर्स यांनी COVID-19 संबंधित मजकूर Snapchat वर पाहिला आहे. यूएसमधील 40% पेक्षा जास्त जनरेशन झेड यांनी माहिती मिळत राहण्यासाठी या माहितीचा आधार घेतला आहे. ***
कोविड -19चा जगभरातील लोकांवर परिणाम होत असतानाच, स्नॅपचॅटर्स त्यांच्या मित्रांशी अगदी जवळून संपर्कात राहिले आहेत, आपण सुरक्षित कसे रहायचे याविषयी योग्यवेळी आणि अचूक स्‍टोरीज त्यांना सहज मिळू शकतात आणि देणगी ते देऊ शकतात तसेच परिणाम घडवू शकणार्‍या मदत कार्यांमध्‍ये जागरूकता आणू शकतात.
__
Snap Inc. अंतर्गत डेटा 22 फेब्रुवारी - 6 मार्च , 2020 विरुद्ध 16 मार्च - 29 मार्च, 2020.
** Snap Inc. अंतर्गत डेटा मार्च 2020.
***Snap Inc. अंतर्गत डेटा मार्च 1 - 29, 2020. जेन झी हे 13-24 वयोगटातील स्नॅपचॅटर्स आहेत. वय आणि स्थान यांचा डेटा मर्यादांच्या अधीन आहे. तपशिलांसाठी https://businesshelp.snapchat.com/en-US/a/audience-size-tool पहा.
पुन्हा न्यूजकडे