2014 LA Hacks Keynote

The following keynote was delivered by Evan Spiegel, CEO of Snapchat, during LA Hacks at Pauley Pavilion on April 11, 2014.
11 एप्रिल, 2014 रोजी पॉली पॅव्हेलियन येथे एलए हॅक्सदरम्यान स्नॅपचॅटचे मुख्य कार्यकारी अधिकारी इव्हान स्पीगल यांनी पुढील भाषण दिले.
या संध्याकाळी तुम्ही माझ्यासाठी काढलेला वेळ आणि माझे सांगणे लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. या गोष्टी तयार करण्यासाठी इतकी सारी तरुण मंडळी इथे आली आहेत ही एक चांगली गोष्ट आहे. मला सहभागी करून घेतल्याबद्दल आपले आभार.
लोकं मला नेहमी यशाची गुरुकिल्ली काय असे विचारत असतात आणि मी स्वतः देखील अतिशय जिज्ञासू आहे.
पण तसे आत्ता पर्यंत जोवर मला उत्तर सापडले नव्हते तोवर नव्हते. मी इतका नशीबवान होतो की हॉंगकॉंग मधील एका हुशार वृद्ध माणसाने माझ्या हात पाहून भविष्य सांगितले. मी ३० वर्षाचा होईपर्यंत माझे लग्न होऊन मला एक मुलगा होईल हे तर त्याने सांगितलेच त्याबरोबर त्यांनी मला हमखास यश मिळवून देणाऱ्या तीन गोष्टींबद्दल सांगितले.
ते पुढील प्रमाणे आहेत:
१. मेहनत
२. क्षमता
३. मानवी नाती
समजा तुम्ही सर्वजण शुक्रवारी रात्री १० वाजता पुढील ३६ तास सलग काम करायचे आहे असे ठरवून एकत्र आला आहात - मला वाटत नाही क्षमता आणि मेहनत याबाबत मी अजून वेगळं काही सांगायला हवं. ते तुमच्या कडे आहेच.
तर मग मी आज मानवी नातेसंबंध या बाबत बोलणार आहे. याचा अर्थ एकमेकांना Linkedin वर ॲड करणे किंवा आपली व्हिजिटिंग कार्ड देणे हे नाही परंतु वेळोवेळी एकमेकांबरोबर होणाऱ्या गहन, उत्कट आणि उत्साहपूर्ण संभाषणाद्वारे निर्माण झालेली नाती.
मला वाटते की Snapchat मध्ये आम्ही जे काही करतो ते मी माझ्या हायस्कूल, क्रॉसरोड येथे शिकलो, जे त्यांनी Ojai Foundation कडून घेतले होते - . तुमच्यापैकी काही जणांना हे विचित्र वाटेल पण हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. म्हणजे आठवड्यातून एकदा १० पेक्षा जास्त टीम मेम्बर्सने एकत्र येऊन त्यांना काय वाटते या बाबत चर्चा करायची . जसे यशस्वी होण्याचे तीन मंत्र आहेत तसेच कौन्सिल ने ठरवलेले तीन नियम देखील आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे नेहमी मनापासून बोला, दुसरे म्हणजे लक्षपूर्वक ऐका आणि तिसरे जे कौन्सिलमध्ये घडते त्याबाबत बाहेर कळता कामा नये. आम्हाला आढळले आहे की हे विशिष्ट संयोजन तुमच्या भावना कशा व्यक्त कराव्या हे शिकण्यासाठीच नव्हे तर इतरांच्या भावना समजण्यासाठी आणि त्यांना समजून घेण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
माझ्या एका मित्राने मला सांगितले की ज्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टींबद्दल सांगावेसे वाटत असते तेव्हा तुम्हाला माहिती असते की तुमचे त्या व्यक्तीवर प्रेम आहे, मी फक्त असे म्हणेन की तुम्हाला ज्याचे ऐकावे असे वाटते अशी ती व्यक्ती असेल.
मनापासून बोलणे आणि लक्षपूर्वक ऐकणे याचे महत्त्व कमी न लेखता मी जे कौन्सिल मध्ये घडते त्याबाबत बाहेर कळता कामा नये या बाबत बोलणार आहे. कौन्सिल दरम्यान व्यक्त केलेल्या भावना इतर कोणालाही समजणार नाहीत याची खात्री असल्याने आपण मोकळेपणाने व्यक्त होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला आपल्या एकदम अंतर्गत विचार असे विचार जे इतर वेळी व्यक्त केल्यास गैरसमज होऊ शकतात असे विचार देखील व्यक्त करता येतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे आपण कौन्सिल मध्ये असलेल्या गोपनीयतेचा आदर करतो.
दुर्दैवाने, बऱ्याचदा गोपनीयता आणि रहस्य या यामध्ये गल्लत केली जाते, जसे निसेनबम ने सांगितले आहे, गोपनीयता ही प्रत्यक्ष संदर्भाच्या आकलनावर आधारित असते. फक्त काय बोलले गेले हे नाही तर कुठे आणि कुणाला उद्देशून बोलले गेले हे सुद्धा वेगळ्या संदर्भात वेगळ्या लोकांसोबत वेगवगळ्या गोष्टी शेअर केल्यामुळे तयार झालेल्या सलोख्याचा आनंद आपल्याला या गोपनीयतेमुळे घेता येतो.
कुंदेरा लिहितात," आपण एकांतात असताना आपण मित्रांशी असभ्य भाषेत बोलतो, त्यांची निंदा करतो ; आपण सार्वजनिक ठिकाणी असताना वागतो त्यापेक्षा खाजगीत वेगळे असतो हा अगदी उघड उघड असणारा अनुभव आहे, हे प्रत्येकाच्या बाबत अगदी असेच असते. नीट पाहता; हे उघड असलेले सत्य, दुर्लक्षित राहते, एखाद्या कल्पनेतील पारदर्शक अशा काचेच्या घरासारखे, हे इतर सर्वांपेक्षा महत्त्वाचे आहे की ते क्वचितच समजले जाते.
इंटरनेट येण्याआधी अमेरिकेत, आपले खाजगी आणि सार्वजनिक आयुष्य आपण कुठे आहोत यावर ठरत असे, आपले कामाचे ठिकाण आणि आपले घर. आपले मित्र आणि आपला परिवार यांच्याशी होणारे संवाद ज्या संदर्भात असायचे ते अगदी स्पष्ट होते. कामाच्या ठिकाणी, आपण व्यावसायिक आणि घरी नवरा, बायको, मुलगा किंवा मुलगी.
खूप थोडे लोक आहेत ज्यांना सार्वजनिक आणि खाजगीत मत प्रदर्शनात असलेला फरक सेलिब्रेटींज म्हणजे अशी व्यक्तिमत्वे ज्यांचा त्यांच्या जीवनावर परिणाम होतो त्यांच्या पेक्षा नीट लक्षात येतो. जेव्हा एखाद्याची गोपनीयता धोक्यात येतो जेव्हा एखादा काही शेअर करतो त्याचा संदर्भ तुटलेला असतो तेव्हा सार्वजनिक आणि खाजगी यातील फरक स्पष्ट होतो.
नुकतेच एका एअरपोर्ट वर पाहिलेल्या न्यूजवीक च्या स्पेशल इश्यू मध्ये मर्लिन मन्रोचे “Lost Scrapbook” प्रदर्शित करण्यात येणार असल्याचा दावा केला होता. खरेच, एक वार्ताहराला तिने तिचा तसेच मित्र असलेल्या फोटोग्राफर साठी केलेले स्क्रॅपबुक सापडले होते.
तो वार्ताहराने स्क्रॅपबुक बाबत असे लिहिले आहे, “ ही खरी मर्लिन आहे, तिचे केस विस्कटलेले आहेत, आणि कोणी तिच्याबद्दल काय विचार करेल किंवा ते तिच्याकडे कसे पाहतील याविषयी काळजी करीत नाहीत. ती ते फोटो कसे आले आहेत ते पाहत नाहीये. तर ती त्या फोटोमध्ये काय करत आहे त्याकडे पाहत आहे. तिला त्यात आनंद मिळत आहे."
त्याची पाने रंगीत आहेत, त्यावर मार्लिनच्या फोटो बाजूला तिच्या भावना,विचार लिहिलेले आहेत. तिचा एक बाथरोब मधला फोटो आहे त्यात तिच्या सभोवताली प्रोडक्शन गिअर आहेत, तिथे तिने लिहलंय," काम करणाऱ्या मुलीला खाजगी जीवन नसते". मर्लिनला स्क्रॅपबुक म्हणजे अशी खाजगी जागा वाटली जी ती तिच्या फोटोग्राफर मित्रासोबत शेअर करू शकते. ते तिच्या सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाचा भाग नव्हते.
इंटरनेट आपल्याला आपल्या भावना ज्या शेअर करता येतात अशा भावनांचे स्क्रॅपबुक तयार करण्यास प्रोत्साहित करते, कोणत्याही संदर्भाविना, केवळ आपल्या मित्रांना किंवा आपल्या प्रेक्षकांच्या आनंदासाठी. आपल्या भावना माहिती म्हणून सादर केल्या जातात- आपल्या बद्दल मत प्रदर्शन करण्यासाठी.
इंटरनेट वर आपण माहितीकडे, तिची वैधता ठरवताना तिच्या लोकप्रियतेनुसार मांडतो. जर एखादी वेबसाईट दुसऱ्या एका वेबसाईटने सुचविलेली असेल तर तिचे महत्व आणि अचूकते बद्दल खात्री वाटते. समाज माध्यमांवर व्यक्त केलेल्या भावना याच पद्धतीने पाहिल्या जातात, त्यांचे मूल्यमापन केले जाते आणि पुढे पाठवल्या जातात. लोकप्रिय असलेल्या मताला जास्त किंमत असते.
समाज माध्यम व्यवसाय आमच्या वैयक्तिक संबंधांमध्ये भांडवलशाहीच्या आक्रमक विस्ताराचे प्रतिनिधित्व करतात. आम्हाला आमच्या मित्रांसाठी परफॉर्म करायला सांगितले जाते, त्यांना आवडेल असे काहीतरी करून दाखवावे लागते, एखाद्या "वैयक्तिक ब्रँड" वर काम करायला सांगितले जाते - आणि ब्रँड कडून आपल्याला हे शिकायला मिळते की अस्सलपणा सिद्ध होण्यासाठी सातत्याची गरज असते. आपण आपल्या स्वत्वाला मान दिला पाहिजे आणि आपल्याला मित्रांसमोर जाताना त्याचे प्रतिनिधित्व केले पाहिजे अन्यथा बदनामीची शक्यता असते.
परंतु माणुसकी मध्ये खरे खोटे असे काहीच नसते. आपल्या बदल घडत असतात आणि आपण विरोधाभासी असतो. हीच माणसाच्या जीवनातील गंमत आहे. आपण काही ब्रँड नाही, तसा आपला स्वभावच नसतो.
तंत्रज्ञानाने पारदर्शक ग्लास हाऊसचा भ्रम कायम ठेवला आहे आणि अशी विचारसरणी तयार केली आहे की ज्यामध्ये लोक एखाद्या वैचारिक मतापेक्षा लोकप्रियतेला जास्त महत्त्व देतात. अधिक माहिती म्हणजे अधिक ज्ञान यावर आमचा अजूनही विश्वास आहे. आणि आम्ही अशा काळात राहत आहोत ज्याचे वर्णन रोझेन ने केले आहे, "अति व्यक्तिगत माहिती जी मित्र किंवा सहकाऱ्यांसमोर उघड केली जाते ती कदाचित अशा लोकांसमोर येते ज्यांना थोडी कमी समज आहे आणि ते तिचा चुकीचा अर्थ लावतात."
ज्या वेळी आपण व्यक्त होत असतो,ते आपण अशा समजुतीने करतो की ते सर्वाना माहिती होईल आणि कायमस्वरूपी राहील. आपल्या अशा प्रकारे व्यक्त होण्यास प्रवृत्त केले जाते जे जास्तीत जास्त लोकांना मान्य असेल. लोकप्रियतेच्या नादात आपण स्वत्व गमावून बसतो.
मला याची खंत वाटते की आपण एक अशी पिढी निर्माण करत आहोत ज्यांचा असा समज आहे की ज्याच्या मागे जास्त समर्थक आहेत तो नेता यशस्वी. माझ्या मते एक यशस्वी नेता तो असतो ज्यांना एक विचारसरणी असते काही तत्त्वे असतात. आणि तो दृष्टिकोन विकसित केला जाणे आवश्यक आहे,एकट्याने नाही पण खाजगीत अन्यथा लोकप्रियतेच्या नादात त्याचे महत्त्व कमी होण्याची शक्यता असते.
प्रोत्साहनासाठी, मी बर्‍याचदा रुझवेल्टने सोरबॉन येथे म्हटलेल्या शब्दांवर विसंबून राहिलो आहे, ते म्हणतात , “ जो चुका मोजतो;जो एखादा मोठा माणूस कसा अडखळला हे दाखवून देतो;किंवा एखाद्याने केलेलं काम आणखी चांगल्या रीतीने कसे करता आले असते हे दाखवून देतो तो टीकाकार नसतो." श्रेय प्रत्यक्ष काम करणाऱ्या माणसाला मिळते, ज्याचा चेहरा घाम,रक्त धुळीने माखला आहे, जो सातत्याने प्रयत्न करत असतो,जो चुका करतो, जो वारंवार कमीपणा घेतो,कारण प्रयत्न म्हटले की चूक, कमतरता असतेच;पण केल्याशिवाय होतच नाही; ज्यांना उत्साह,झोकून देणे,एखाद्या चांगल्या कामासाठी वेळ देतो,ज्याला अंतिम विजयाचे महत्त्व माहिती आहे, आणि जरी तो अयशस्वी झाला तरी मोठे धाडस करताना तो अपयशी झाला असल्याने त्याची गणती अशा लोकांत होणार नाही ज्यांना विजय आणि पराजय समजलेलं नसते.
आपण असा एक समाज तयार केला आहे ज्यात प्रत्यक्षात लढणारा मनुष्य,त्याचे जीवन,त्याचे कुटुंब,किंवा त्याच्या मतांसाठी लढत नसतो तर तो लढत असतो प्रेक्षकांसाठी आणि टाळ्यांसाठी आणि आपण पिटात बसलेले प्रेक्षक, ज्यांची करमणूक होत आहे, ज्यांना भरपूर खायला प्यायला मिळालेलं आहे तरी आपण खरेच आनंदात आहोत का?
कुंदेरा लिहितात," जेव्हा दुसऱ्याच्या खाजगी जीवनात ढवळाढवळ करणे ही पद्धत किंवा नियम बनते तेव्हा आपण अशा स्थितीत जातो जिथे माणसाचे असणे पणाला लागलेले असते.
माझ्या मते हीच ती वेळ आहे.
जाता जाता मी तुम्हाला अध्यक्ष केनेडी यांची हत्या झाली त्या दिवशीच्या भाषणातील शेवटच्या परिच्छेदातील काही वाक्ये सांगणार आहे. त्यादिवशी, केनेडी युद्धाच्या प्रसंगी बोलले असते. आज मी तुम्हाला ऐका असे सांगत आहे कारण आपण मानवी संहाराची रोखण्याच्या लढाईला सामोरे जात आहोत.
"आपण, या देशातील, या पिढीतील,लोक ठरवून नाहीतर नियतीमुळे या जागतिक स्वातंत्र्याच्या भिंतीवरील पहारेकरी आहोत. म्हणूनच आम्ही मागतो, आम्ही सत्ता आणि जबाबदाऱ्या घेण्यास योग्य आहोत, आम्ही आमच्या ताकदीचा विचारपूर्वक आणि संयमाने वापर करू, आणि प्राचीन दृष्टिकोनातून समस्त पृथ्वीवर शांतता आणि मानवी कल्याण या गोष्टी साध्य करू." हेच आमचे ध्येय असावे आणि आमच्या सामर्थ्याचे कारण आमचा चांगुलपणा हेच आमच्या सामर्थ्याचे कारण आहे. फार पूर्वी लिहून ठेवलंय :" प्रभू शहराचे रक्षण करणार असेल तर पहारेकऱ्यांचे जागणे व्यर्थच."
आपण इथे हा कलंक नष्ट करायचा आहे की हॅकिंग प्रामुख्याने अशा गोष्टी उघडकीस आणण्या साठी केले जाते ज्या इतरांनी उघडकीस आणू असे वाटत असते. मी तुम्हा सर्वाना आव्हान देतो, या वीकेंडला अशी एक जागा तयार करा, या महत्त्वाच्या वेळी,जी इतरांच्या भावना,विचार,आणि स्वप्ने यांचा मान राखेल. शेअरिंग करण्यात आणि काहीतरी तयार करण्यात आराम आणि आनंद मिळविण्यासाठी आम्ही आलो आहोत.
Back To News