Introducing our First CitizenSnap Report

Today we are releasing our first-ever CitizenSnap report, which explains the way we operate our business and support our team, our community, and our partners – as well as, more broadly, our society and environment.
संपादकाची टीप: स्‍नॅप चा सीईओ इव्हान स्पायजेलने रविवार, 29 जुलै रोजी सर्व स्‍नॅ टीम सदस्यांना खालील मेमो पाठविला.
टीम,
आज आपण कशा पद्धतीने आमचा व्यवसाय करीत आहोत आणि आमच्या टीमला, आमच्या समुदायाला आणि आमच्या भागीदारांना तसेच व्यापक द्रदृीकोनातून आमच्या समाजाला आणि पर्यावरणाला जपत आहोत याबद्दलचा हा पहिला सिटीझन स्नॅप अहवाल आपण आज प्रदर्शित करीत आहोत. हा अहवाल ज्यामध्ये, आमचा वेगळेपणा, आमची एकता, आमची मेहनत आणि संबंधित माहिती, निरोगी समाजाची निर्मिती आणि असे वातावरण जे स्वच्छ आणि सुरक्षित असेल, ज्यामध्ये स्नॅपचे सर्वोत्कृष्ट योगदान असेल जेणेकरून आमचा व्यवसाय पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास सक्षम आहे असा आमचा विश्वास आहे. आम्हाला नफा हा आमच्या टीमचे , समुदायाचे आणि भागीदारांच्या यशाचे उत्पादन घ्यायचा आहे - त्यांच्या खर्चावर नाही.
याचा अर्थ असा आहे की आम्ही आमचे यश हे आम्ही जसे आमच्या टीमला, आमच्या समुदायाला आणि आमच्या भागीदारांना कशी वागणूक देतो यावर परिभाषित होते. आम्ही सामान विजय निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून सगळ्या पक्षांना विजयाचा समान वाटा मिळेल. कॉर्पोरेट सिटिझनशिप हे आमच्यासाठी एक साधन नाहीये, तर आम्ही आमचा व्यवसाय कशा पद्धतीने करतो याचे ते प्रतिबिंब आहे.
कॉर्पोरेट व्यक्तिमत्त्वाचा अनोखा इतिहास असणाऱ्या अमेरिकेमध्ये आमचे मुख्यालय आहे, त्याच्या घटनेच्या 14 व्या दुरुस्तीद्वारे (नागरी युद्धानंतरच्या पुनर्निर्माण दरम्यान मंजूर केलेले) समान संरक्षणाची हमी देतात. अमेरिकन सरकार आणि कोर्टाने हे स्पष्ट केले आहे की व्यवसाय हा समाजात फक्त नफा वाढविणारे यंत्रे नाहीत, तर हक्क आणि जबाबदाऱ्यांसह आपल्या नागरिकांबरोबर सहभागी असतात. देशामध्ये ज्या मूलभूत कायद्यांचे पालन केले जाते आमची जबाबदारी ही त्याही पुढची आहे जिथे सकारात्मक बदल घडविणे यासाठी आम्ही कटिबद्ध असतो.
अमेरिकेमध्ये आम्ही हे शिकलो कि आपल्या भूतकाळाची आठवण ठेवल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आणि कोणाच्यातरी बलिदानातून आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत याची जाणीव ठेवायची असते. आमच्या देशाची संपत्ती चोरलेल्या जमीनी आणि चोरीच्या मजुरांवर उभी राहिलेली होती: गुलाम झालेल्या लोकांनी आमच्या राष्ट्राच्या समृद्धीसाठी आर्थिक पाया घातला, जशी जबरदस्तीने स्थानिक लोकांकडून जबरदस्तीने जमीन घेतली गेली होती. आमचे मुख्य कार्यालय जेथे आहे, ती जमीन मुलाची चुमॅश आणि तोंग्वा यांची आहे.
हे समजून घेण्यासाठी की आफ्रिकन अमेरिकन कुटुंबांमध्ये अंदाजे दहापट श्वेत अमेरिकन कुटुंबांची सरासरी संपत्ती आहे, आपण आपल्या वर्तनाला दोष देणे आवश्यक आहे. वास्तविकता ही आहे की 2018 मधील मूळ अमेरिकन लोकांमध्ये दारिद्र्याचे प्रमाण श्वेत अमेरिकन लोकांपेक्षा अडीच पट जास्त होते. या तथ्यांद्वारे आपल्या जाणिवेतील मूल्ये प्रतिबिंबित होत नाहीत.
हे स्पष्ट आहे की आपल्याकडे पर्याय आहे: अमेरिकेमध्ये या शाश्वत असमानतेला थारा देणे किंवा आपण समाज म्हणून टिकून राहू इच्छित असलेल्या सामायिक मूल्यांना चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी आपली योग्य भूमिका पार पाडणे. आमच्या नागरिकांमध्ये असमानतेने विभागल्या गेलेल्या अमेरिकेत मोठ्या प्रमाणात व चालू असलेल्या रचनात्मक असमानता आणि धोरणे पाहता व्यायवसायिक म्हणून आमचे कठोर प्रयत्नसुद्धा व्यापक सामाजिक बदल घडविण्यास सक्षम आहेत हे सूचित करणे दिशाभूल करणारे ठरेल, परंतुु काहीही न करता नुसते बघत देखील आम्ही राहणार नाही. आम्ही हे एकट्याने करू शकत नाही, पण आम्ही आमची भूमिका पार पाडत आहोत.
दारिद्र्य कमी करण्यासाठी, शैक्षणिक संधींसाठी, आवश्यक त्या डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि आपल्या देशातील असमानतेच्या इतिहासाचा धैर्याने सामना करण्यासाठी, आम्ही आमचा आवाज, आमचे व्यावसायिक व्यक्तित्व याची गुंतवणूक देशाचे भविष्य घडविण्यासाठी नक्कीच करू . वेतनाची पद्धती, कामावर घेणे आणि समाविष्ट करणे, कर प्रणाली, पुरवठा साखळी आणि ऊर्जेचा वापरासह अशा गोष्टी ज्या थेट प्रभाव टाकू शकतात याची सुरुवात आमच्या व्यवसायापासून होते. आम्ही याची खात्री करून घ्यायची आहे की आमच्या टीम मधील सर्व सदस्य, आमचा समुदाय आणि आमचे भागीदार हे आपण स्वतः कोण आहोत हे समजून आणि कौतुकाने साजरे करतील: प्रत्येक व्यक्ती ही त्यांच्या वेगळेपणही सारखी असते.
आमच्या सिटीझन स्नॅप अहवालाचा हा पहिला "कच्चा मसुदा" आहे तो कृपया समजून घ्या, हे प्रयत्न आम्ही कसे करत आहोत, आम्ही शिकण्याची, मोठं होण्याची आणि पुन्हा याच गोष्टी करण्याची आमची इच्छा यातून दिसून येते. आज आम्ही आमच्या प्रयत्नांमध्ये कमी पडत आहोत यात आम्हाला काही शंका नाहीये. आमच्याकडे करण्यासारखे काम खूप आहे आणि आमच्या टीमला असे वाटते की स्वतःला सामाजिकरीत्या जबाबदार धरणे महत्त्वाचे आहे. आम्हाला असा विश्वास आहे की स्नॅपच्या प्रगतीतील सर्वात मोठी दीर्घकालीन मर्यादा ही आमच्या समाजाचे व्यापक यश आहे आणि आम्ही त्यानुसार स्वतःची गुंतवणूक करू.
इव्हान
Back To News