Snap Partner Summit | The Future of Lenses

Today, we’re making it easier to find the right Lenses at the right time. Just press and hold on your camera screen to Scan the world around you.
जवळपास चार वर्षांपूर्वी आम्ही लेन्स सादर केल्या : आपला सेल्फी पाहण्याचा संपूर्ण नवीन मार्ग!
आम्ही बनविलेल्या पहिल्या लेन्स सेल्फ एक्स्प्रेशन्ससाठी होत्या. नेक्स्ट वर्ल्ड लेन्सः 3D स्टिकर्स, बिटमोजी आणि डान्सिंग हॉट डॉग्स तुमच्‍या सभोवतालच्या जगावर आच्छादित झाले. अलीकडेच आम्ही Snappables- आपण आपल्या चेहर्‍यासह खेळू शकणाऱ्या गेमला लाँच केले!
केवळ एका वर्षाच्या आत आमच्या समुदायाद्वारे 400,000 हून अधिक लेन्स तयार करण्यात आल्या आहेत आणि लोकांनी या लेन्ससोबत 15 अब्जपेक्षा जास्त वेळा खेळले आहेत! लेन्स क्रिएटरना त्यांचे कार्य दर्शविण्यात मदत करण्यासाठी आणि त्यांच्या प्रेक्षकांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही क्रिएटर प्रोफाइल सादर करीत आहोत.
आम्ही त्यांना लेन्स म्हणतो कारण ते केवळ तुमचे जग फिल्टर करीत नाहीत. ते तुम्‍हाला नवीन काहीतरी विसर्जित करण्याची देखील अनुमती देतात. आम्हाला विश्वास आहे की भविष्यात, या प्रकारचे अनुभव तुमच्‍या भोवतालच्या जगावर बोलण्याचे, तयार करण्याचे, शिकण्याचे आणि खेळण्याचे नवीन मार्ग मिळतील.
आज, आम्ही योग्य वेळी योग्य लेन्स शोधणे सुलभ करतो.
AR बार आणि स्कॅन
स्नपने या व्यासपीठावर नवीन अंतर्भूत असलेल्या लेन्सेसचा अनुभव आणि शोधण्याच्या योग्यतेसह जोमदार कॅमेरा माहिती करून दिलेला आहे. स्नॅपचॅटर्ससाठी "AR बार" आणि "स्कॅन" लवकरच वापरात आणणार आहोत.
स्नॅपचॅटवर कॅमेरा आणि लेन्सेस योग्य दिशेने आणि शोधण्याचा अनुभव स्नॅपचॅटर्ससाठी अधिक सुलभ करण्यासाठी AR बारची निर्मिती करण्यात आलेली आहे. AR बारसह स्नॅपचॅटर्स पहिल्यांदाच निर्माण करणे, स्कॅन, ब्राऊज आणि शोधण्याच्या क्रिया एकाच ठिकाणी करू शकतील.
AR बारमध्ये नवीन स्कॅन बटनाचे फीचर समाविष्ट केले आहे, जे संदर्भाशी संबंधित लेन्सेस आणि कॅमेराही निगडित अनुभव एका बटणावर मिळण्यासाठी तयार केले आहे.
स्नॅप पब्लिक समुदायाने लेन्स स्टुडिओच्या माध्यमातून स्नॅप बरोबर तयार केलेल्या संबंधित लेन्सेस स्नॅपचॅटर्ससाठी त्यांच्या कॅमेरा व्ह्यूवर काय आहे यावर आधारून जलदरीत्या समोर दिसतील.
स्नॅपसुद्धा नवीन स्कॅनच्या भागीदारांची ओळख करून देत आहे.
फोटोमॅथ बरोबरच्या भागीदारीमधून, स्नॅपचॅटर्सना कॅमेरामध्ये गणिताच्या समीकरणांची उत्तरे स्नॅपचॅट कॅमेरामध्ये दिसू शकतील. याव्यतिरिक्त, नव्याने भागीदार झालेले गिफी स्नॅपचॅट कॅमेराच्या व्ह्यूवर आधारित संदर्भाशी संबंधित, वेगाने तयार होणाऱ्या GIF लेन्सेसबरोबर स्नॅपचॅटर्सना त्यांचे स्नॅप सजविण्यासाठी आमंत्रित करू शकतील.
लेन्स स्टुडिओ आणि "लॅन्डमार्कर्स"
स्नॅपचे लेन्स स्टुडिओ हे डेस्कटॉपसाठी मोफत असलेले आणि सगळ्यांना उपलब्ध असणारे अ‍ॅप आहे, ज्याने कोणीही स्नॅपचॅटवर लेन्सेस बनवू आणि वितरीत करू शकतो. लेन्स स्टुडिओ स्नॅपची अत्याधुनिक कॉम्पुटर दृष्टी आणि ग्राफिकचे तंत्रज्ञान हे बनविणाऱ्यांसाठी सोप्या टेम्प्लेट्सच्या स्वरूपांमध्ये संकलित करून देते. लेन्स स्टुडिओच्या माध्यमातून स्नॅपच्या समुदायाने 400,000 हून अधिक लेन्स केलेल्या आहेत आणि त्या लेन्सस 15 अब्जाहून अधिक वेळा वापरल्या गेल्या आहेत.
आज स्नॅप लेन्स बनविण्याच्या अधिक क्षमतेसह जसे की, हॅन्ड ट्रॅकिंग, बॉडी ट्रॅकिंग आणि पेट ट्रॅकिंगच्या टेम्प्लेट्ससह लेन्स स्टुडिओ अद्ययावत करीत आहे.
पहिल्यांदाच, लेन्स स्टुडिओने स्नॅप्सच्या सगळ्यात नवीन लॅन्डमार्कर लेन्स अनुभवाचे टेम्प्लेट समाविष्ट केले आहे. ह्या लेन्सेस सद्य स्थितीतील अनुभवांना वाढवितात, जेणेकरून जगातील मोठ्या प्रतीकात्मक जागा आपल्याला जिवंत झाल्याचा अनुभव देतात.
आज निर्मात्यांकरिता जागांचे टेम्प्लेट्स उपलब्ध आहेत, ह्यामध्ये बकींगहॅम पॅलेस (लंडन), अमेरिकेची कॅपिटॉल इमारत (वॉशिंग्टन, D.C ), आयफेल टॉवर (पॅरिस ), फ्लातिरों इमारत (न्यूयॉर्क शहर) आणि TCL चायनीज थिएटर (लॉस अँजेलिस) सह अनेक गोष्टी पाहू शकतो.
या जागांना प्रत्यक्षात भेट देणारे स्नॅपचॅटर्स देखील आजपासून या लँडमार्कर-सक्षम लेन्सचा अनुभव घेण्यास तयार असतील.
Back To News