On-Demand Geofilters

On-Demand Geofilters let you create and publish a Geofilter for your party, wedding, business, or any other place or event. It’s a fun way to help your friends or customers decorate their Snaps, wherever they are!
जिओफिल्टर्स स्नॅपचॅटच्या आमच्या पसंतीच्या भागांपैकी एक आहेत. Snapchat सांप्रदायाच्या सर्जनशीलतेने आम्ही थक्क झालो आहोत, आणि आपल्या कौशल्यकामांमार्फत उजागर प्रत्येक स्थानाचे व्यक्तिमत्व पाहणे आम्हाला आवडले. आजच्या तारखेपर्यंत, जवळपास अर्धा दशलक्ष जिओफिल्टर्स जमा केले गेलेत, व दर दिवशी, जिओफिल्टर्सने ओव्हरले केलेले स्नॅप्स शेकडो लाखो वेळा पाहिले जातात!
आम्ही प्रारंभी सार्वजनिक ठिकाणांसाठी समुदाय जिओफिल्टर्सची रचना केली — पण ज्या स्नॅपचॅटर्सना त्यांच्या व्यवसाय किंवा खाजगी कार्यक्रमासाठी जिओफिल्टरची आवश्यकता होती त्यांच्याकडून सातत्याने ऐकल्यावर, आज आम्ही काहीतरी नवीन घोषित करत आहोत:
ऑन-डिमांड जिओफिल्टर्स तुम्हाला तुमच्या पार्टी, विवाह, व्यवसाय किंवा इतर कोणत्याही ठिकाण किंवा कार्यक्रमासाठी जिओफिल्टर तयार किंवा प्रकाशित करू देतात. तुमच्या मित्र-मैत्रिणी किंवा ग्राहकांना ते जिथे असतील तिथे त्यांचे स्नॅप्स सजविण्यासाठी मदत करण्याचा हा एक मनोरंजक मार्ग आहे!
ते कसे कार्य करते:
  • डिझाईन — फिल्टर बनविण्यासाठी तुमचे आवडते इमेज एडिटर वापरा. तुम्ही ते सुरु करण्यासाठी आम्ही काही टेम्प्लेट्स देतो जी फोटोशॉप आणि इलस्ट्रेटरसाठी अनुकूल आहेत :)
  • नकाशा— जिथे तुमचा फिल्टर दिसेल तिथे जिओफेन्स निवड, त्यानंतर तुम्हाला तुमचा जिओफिल्टर उपलब्ध करून हवा असेल ती वेळ आणि तारीख निवडा.
  • विकत घ्या — तुमचे जिओफिल्टर जमा करा. आमची टीम जलद गतीने त्याचे परीक्षण करतील आणि सगळं नीट आहे असे समजून, तयार करतील आणि सुरु करतील.
तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा संपूर्ण टप्प्यासाठी — एका तासापासून ते तीस दिवसांपर्यंतच्या काळासाठी ऑन-डिमांड जिओफिल्टर्स खरेदी करू शकता! किंमत $5 पासून सुरु होते आणि तुमच्या जिओफेन्सचा आकार आणि तुम्ही निवडलेला कालावधी अशा इतर काही घटकांवर ती अवलंबून असते. ऑन-डिमांड जिओफिल्टर्स आता US, UK, आणि कॅनडामध्ये उपलब्ध आहेत आणि आणखी ठिकाणे लवकरच समाविष्ट केली जात आहेत!
https://www.snapchat.com/on-demand यावरून प्रारंभ करा!
अधिक माहिती आणि FAQ साठी, कृपया आमच्या जिओफिल्टर्स मदत केंद्र यावर जाऊन पहा.
Back To News