Protecting your Privacy

There’s been some confusion about the updated Privacy Policy and Terms of Service we rolled out last week. We never want to create any misunderstanding over our commitment to protecting your privacy.
आम्ही मागच्या आठवड्यात जाहीर केलेल्या गोपनीयता धोरण आणि सेवा अटी या बाबत काही संभ्रम असल्याचे निदर्शनास आले आहे. आपल्या गोपनीयतेच्या सरंक्षणाबाबत असलेल्या आमच्या प्रतिबद्धते बाबत आम्हाला कोणत्याही प्रकारचा गैरसमज निर्माण करायचा नाही.
सर्वप्रथम, आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो: तुम्ही तुमच्या पाठवत असलेले स्नॅप्स आणि चॅट हे या अपडेट च्या आधी होते तितकेच गोपनीय आता देखील आहेत. आमचे गोपनीयता धोरण अजूनही आधी प्रमाणेच आहे ज्यानुसार - "जे संदेश पाहिले गेले आहेत किंवा एक्स्पायर झाले आहेत ते आपोआप डिलीट होतील." अर्थातच, प्राप्तकर्ता त्याचे स्क्रीनशॉट घेऊ शकतो किंवा तुमचे स्नॅप्स किंवा चॅट्स सेव्ह करू शकतो. परंतु महत्त्वाचा मुद्दा हा आहे की - Snapchat ला आपल्या वैयक्तिक स्नॅप्स किंवा चॅट्स साठवून ठेवण्यात स्वारस्य नाही आणि कधीही नसेल. आणि म्हणूनच आम्ही, ते वाचून झाल्या झाल्या आमच्या सर्व्हर मधून डिलीट करून टाकतो, आम्ही ते आमच्या जाहिरातदार किंवा व्यवसायातील भागीदारांना शेअर करू शकत नाही आणि करतही नाही.
हे देखील खरे आहे की आमच्या सेवा अटींनुसार आम्हाला आणि आमच्या सारख्या सेवा देणाऱ्या इतरांना आपण तयार केलेले मजकूर वापरण्याचा व्यापक परवाना असतो. त्या परवान्याची आम्हाला, उदाहरणार्थ लाईव्ह स्टोरी यांचे स्नॅप्स जेव्हा सादर केले जातात जेव्हा आम्हाला ती कथा संपूर्ण जगाला दाखवण्याची किंवा पुनःप्रदर्शित किंवा सिंडिकेट (याबाबत हे करू शकतो हे आम्ही आमच्या सेवा अटी आणि गोपनीयता धोरण यामध्ये म्हटले आहे) करायची गरज असते, तेव्हा उपयोग होतो. पण आम्ही इथे हे स्पष्ट करत आहोत की, हे गोपनीयता धोरण आणि तुमच्या ॲप मध्ये असलेली गोपनीयता विषयक सेटिंग्ज याचा वापर करून तुम्ही या परवान्याची मर्यादित ठेवू शकता आणि त्यामुळे तुमची वैयक्तिक संभाषणे खरोखरच फक्त तुमची वैयक्तिक राहतात.
आम्ही आमची गोपनीयता धोरणे आणि वापराच्या अटी बदलल्या याचे तुम्हाला आश्चर्य वाटत असेल. त्याही महत्त्वाची कारणे
  • आम्ही जी मुख्य गोष्ट केली ती म्हणजे अटी आणि गोपनीयता धोरणे यांचे पुनर्लिखाण केले त्यामुळे लोकं जसे बोलतात ताशपद्धतीने त्या वाचल्या जातील. आम्ही नेहमीच आमच्या समुदायासमोर आणि स्पष्ट राहण्याचा प्रयत्न करतो.
  • अ‍ॅपमधून खरेदी संदर्भात सेवा अटींमध्ये आम्ही भाषा दिलेल्या आहेत. आम्ही रिप्लेज विकणे हे करणे आता आमच्यासाठी आवश्यक झाले आहे — आणि अजून काही मस्त उत्पादने आणि सेवा तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचे आम्ही बघत आहोत.
  • तुमच्या मित्रांना तुम्हाला स्नॅपचॅटवर शोधणे अधिक सोपे व्हावे यासाठी, काय माहिती असावी हे आम्ही अधिक स्पष्ट केले आहे— जसे की तुमचे नाव— इतर स्नॅपचॅटर्सना कसे दिसेल आणि ही माहिती तुम्ही कशी बदलू शकता.
सेवाविषयक अटी तसेच गोपनीयता धोरण ही दोन्हीही अत्यंत महत्त्वाची कागदपत्र आहेत आणि सर्व स्नॅपचॅटर्सना आम्ही सांगू इच्छितो की त्यांनी ती वाचावीत. अधिक माहितीसाठी पहा, Snapchat सपोर्ट ज्या मध्ये स्नॅप्स आणि चॅट्स कधी डिलीट केली जातात याविषयी माहिती आहे आणि आमची समुदाय विषयक नियमावली
Back To News