Safety First

As communities continue preparing for and responding to the public health crisis posed by COVID-19, we wanted to share an update on our efforts to prioritize the health and safety of our Snapchat community, our partners, our team, and the world we all share together.
कोविड-19 च्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या प्रश्नासाठी समुदाय सज्ज होऊन सतत प्रतिक्रिया देत आहे, आमची Snapchat समुदाय, आमचे पार्टनर/भागीदार, आमची टीम आणि आपण एकत्रितपणे राहत असलेल्या या जगाच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न प्रामुख्याने शेअर करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.
या व्हायरसचा प्रसार कमी व्हावा याकरिता आमची मुख्य टीम सुरक्षेचे सगळे नियम पळून आणि सुरक्षित अंतर ठेऊन लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग बनलेली आहे. या निर्माण झालेल्या अभूतपूर्व कठीण परिस्थितीतून बाहेर पाडण्यासाठी आमचे पार्टनर/भागीदार, आमची टीम एकत्रितपणे काम करीत आहोत.
या कठीण काळात जेव्हा तुमचे कुटुंब आणि जवळचा मित्र परिवार एकमेकांपासून दूर आहेत- त्याकाळात Snapchat ने तुम्हाला जवळ आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही संधी आम्हाला दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आमच्या सर्व्हिसेसमध्ये सहभागी होण्याच्या प्रमाणात कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले आहे आणि सगळे सुरळीत सुरू ठेवण्याच्या आम्ही प्रयत्न करीत आहोत.
आमचा विश्वास आहे की या व्हायरसचा प्रसार थांबविण्यासाठी स्नॅपचॅटर्स महत्‍त्वाची भूमिका बजावित आहेत. निकटवर्तीयांबरोबर संपर्कात राहण्यामध्ये, मित्रांबरोबर गेम खेळण्यामध्ये किंवा परिस्थितीची माहिती ठेवण्यामध्ये —फिजिकल डिस्टंसिन्ग पाळून आमची समुदाय टेक्नॉलॉजीचा पूर्ण वापर करीत आहे.
आम्ही करीत असलेल्या मदतीबद्दल हे थोडे अपडेट:
  • सध्याच्या काळात सुरक्षित राहण्यासाठी तज्‍ज्ञांकडून मान्यता मिळालेले काही सुरक्षेचे उपाय आपल्या कुटुंबियांबरोबर आणि मित्रपरिवाराबरोबर शेअर करण्यासाठी आम्ही स्नॅपचॅटर्सच्या मदतीसाठी अनोखे साधन तयार केले आहे. आम्ही ही माहिती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून मिळवलेली आहे आणि अधिक माहितीसाठी त्यांच्या वेबसाइटशी जोडलेली आहे.
  • स्नॅपचॅटर्स खुद्द तज्‍ज्ञांकडून माहिती मिळावी यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि सेन्टर्स फॉर डिसिझेस कंट्रोल व प्रिव्हेन्शन यांच्याबरोबर आम्ही काम करीत आहोत. स्नॅपचॅटर्ससाठी नियमित माहिती मिळावी यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि सेन्टर्स फॉर डिसिझेस कंट्रोल व प्रिव्हेन्शन त्यांच्या ऑफिशिअल अकाऊंटवरून नियमित अपडेट्स देत आहे, तसेच आमच्या समुदायाकडून आलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आम्ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बरोबर काम करीत आहोत.
  • सध्या लोकांमध्ये तणावाचे आणि काळजीचे वातावरण आहे, जेव्हा स्नॅपचॅटर्स मानसिक आरोग्य, चिंता, नैराश्य, तणाव, आत्महत्येचे विचार, दुःख, छळवणूक अशा विषयांबद्दल सर्च करतील, त्यावेळेस तुमच्यासाठी तुमच्या जवळपास असलेल्या तज्ज्ञांची माहिती मिळवू शकतील असे नवीन फिचर लवकरात कलाकार देण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. विशेषतः कोरोना व्हायरसच्या काळात कोविड-19 याविषयी असलेल्या चिंतेचा सामना करण्यासाठी WHO, CDC, Ad Council आणि Crisis Text Line यांच्याकडून मिळालेल्या उपतुक्त माहितीचा एक नवीन भाग आम्ही समाविष्ट केला आहे.
  • आम्ही खात्रीलायक माहिती पुरवितो. जगभरातील काही मोजक्या विश्वासू न्यूज ऑर्गनायझेशन्स आणि काही मोजक्या पार्टनर/भागीदारांबरोबर आम्ही काम करून आमच्या माहितीचा प्लॅटफॉर्म / व्यासपीठ तयार केले आहे. कोणतेही अजाणते प्रेक्षक किंवा व्यक्ती यांना चुकीची माहिती प्रसारित करण्याची आम्ही संधी देत नाही, तसेच ज्या माहितीमुळे हानी पोहोचणार असेल अशी माहिती जाणतेपणी किंवा अजाणतेपणी प्रसारित न करण्यासाठी स्नॅपचॅटर्स आणि आमच्या पार्टनर/भागीदारांसाठी आमची नियमावली तयार आहे.
  • NBC News’ “StayTuned”, The Washington Post, SkyNews, The Telegraph, Le Monde, VG, Brut India आणि Sabq इत्यादी आणि असे तीसपेक्षा जास्त पार्टनर/भागीदार कोविड-19 संदर्भात सातत्याने बातम्या प्रसारित करीत आहेत.
  • वैद्यकीय तज्ज्ञांकडून येणारी प्रश्न उत्तरे, तसेच कोविड-19 संदर्भातील माहिती आणि टिप्स यांचे सातत्याने प्रसारण करणे आणि त्या शोधणे यासाठी आमची टीम नेहमी काम करत आहे.
ही तर फक्त सुरुवात आहे. आमच्या समुदायाला सपोर्ट करण्‍याचे अधिक मार्ग शोधण्‍याकरिता आम्ही सर्व एकत्र काम करत आहोत. आम्ही आपल्या सर्वांचा विचार करत आहोत आणि या कठीण काळात अधिकाधिक प्रेमाचा प्रसार करत आहोत.
Back To News