How Snaps Are Stored And Deleted

There’s been some speculation lately about how snaps are stored and when and how they are deleted. We’ve always tried to be upfront about how things work and we haven’t made any changes to our practices, so we thought it’d be cool to go over things in a bit more detail.
स्नॅप्स कसे संग्रहित केले जातात आणि केव्हा आणि कसे ते डिलीट करतात याचे कालांतराने अनुमान लावले जातात.  आम्ही कसे काम करतो हे लपविण्याचा आम्ही कधीही प्रयत्न केला नाही आणि आमच्या कामांमध्ये आम्ही काही बदल केलेले नाहीत, त्यामुळे काही गोष्टी तपशिलात करणे उत्तम असेल असा विचार आम्ही केलाय.
स्नॅप्सचा संग्रह 
जेव्हा एखादी व्यक्ती स्नॅप पाठवतो, तो आमच्या सर्व्हर्सवर अपलोड होतो, ज्या व्यक्तीसाठी स्नॅप असेल त्यांना नवीन स्नॅप आल्याची सूचना पाठवली जाते, आणि Snapchat त्या मेसेजची एक प्रत डाउनलोड करून ठेवतो.  फोटो किंवा व्हिडिओ मेसेज तुमच्या डिव्हाईसच्या मेमरीमध्ये तात्पुरता संग्रहित केला जातो.  हे कधीकधी इंटर्नल मेमरी, रॅम किंवा एक्सटर्नल मेमरी जसे की एसडी कार्ड, आपण जो प्लॅटफॉर्म वापरत असू त्यावर आणि तो फोटो आहे कि व्हिडिओ यावर अवलंबून असते
आमच्या सर्व्हर्स वरून स्नॅप्स डिलीट करणे 
जेव्हा स्नॅप बघितला जातो आणि त्याची वेळ संपत येते, तेव्हा अॅप सर्व्हरला सूचना पाठवते जी नंतर स्नॅप पाठविणाऱ्याला, तुमचा स्नॅप पहिल्या गेला आहे अशा सूचनेत रूपांतरित होते जेव्हा सगळ्या स्नॅप्स पाठविणाऱ्यांना सूचित केले जाते की त्यांनी पाठविलेले स्नॅप्स बघितले गेले आहेत तेच ते स्नॅप्स आमच्या सर्व्हरवरून डिलीट केले जातात. जेव्हा एखादा स्नॅप ३० दिवसांनंतर पहिला जात नाही तेव्हा तो ही आमच्या सर्व्हरवरून डिलीट होतो. 
प्राप्तकर्त्याच्या डिव्हाइस मधून स्नॅप्स डिलीट होणे 
स्नॅप्स पाहिल्यानंतर त्याची तात्पुरती तयार झालेली प्रत डिव्हाइसच्या संग्रहातून डिलीट होते. हे लगेचच घडावे याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, याला कधी कधी एक दोन मिनिटांचा कालावधी लागतो.  फोनच्या फाईल सिस्टिमला "डिलीट" अशी सूचना पाठवून फाईल डिलीट केली जाते.  हा सामान्य मार्ग आहे की संगणक आणि फोनवर गोष्टी सामान्यपणे हटविल्या जातात—आम्ही काही विशेष करत नाही (जसे की “वायपिंग).
अधिक माहिती 
जेव्हा एखादा न पाहिलेला स्नॅप डिव्हाइसमध्ये संग्रहित होतो, तेव्हा Snapchat अॅप पेक्षा वरचढ होऊन ती फाईल थेट पाहणे ही काही अशक्य गोष्ट नाही.  ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही ह्या गोष्टीला पाठिंबा देतो किंवा त्याला प्रोत्साहन देतो, आणि बऱ्याच प्रकरणांमध्ये जेलब्रेकिंग किंवा फोन रुटिंग करून फोनची वॉरंटी नष्ट केली जाते.  जर तुम्हाला स्नॅप संग्रहित करायचा असेल तर सोपी पद्धत अशी आहे की, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन किंवा दुसऱ्या कॅमेऱ्याने त्याचा फोटो काढून तो संग्रहित करू शकता.
आणि जरा कधी चुकून तुम्ही ड्राइव्हवरील डेटा डिलीट केला आणि किंवा CSIचा एपिसोड पाहिल्यावर तो डेटा  पुनर्प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असाल, तर तुम्हाला माहित असेल की, योग्य फॉरेन्सिक टूल वापरून डिलीट केलेला हा डेटा आपल्याला कधी कधी परत मिळवता येतो.  तर... तुम्हाला कळलेच असेल.... कोणताही स्वतःचा फोटो काढताना आणि पोस्ट करताना काळजी घ्या :)
Back To News