Sound On, Volume Up: Introducing Sounds For Your Snaps

Today, we launched Sounds, a new feature to add music and your own creations to your Snaps. Music makes video creations and communication more expressive, and offers a personal way to recommend music to your closest friends.
आज आम्ही आवाज हे नवीन फिचर संगीत आणि तुम्ही स्वतःने निर्माण केलेला आवाज तुमच्या स्नॅप्ससाठी प्रदर्शित करीत आहोत. आमच्या या यादीमध्ये जस्टिन बीबर आणि बेनी ब्लान्कोचे नवीन गाणे "लोनली" याचा खास प्रिव्ह्यू समाविष्ट करण्यात आला आहे.
आता iOS वर संपूर्ण जगात स्नॅपचॅटर्स त्यांच्या स्नॅप्समध्ये (काढायच्या पूर्वी आणि नंतर) नवीन तसेच नावाजलेल्या कलाकारांचे संगीत आमच्या जोमदार आणि खास बनविलेल्या यादीमधून वापरू शकतात. संगीतामुळे व्हिडिओची निर्मिती आणि संवाद हे अधिक बोलके होतात आणि तुमच्या जवळच्या मित्रांना हे संगीत ऐकविण्याचा वैयक्तिक मार्ग देतात. साधारणतः अब्ज पेक्षा अधिक स्नॅप्स रोज तयार होतात*.
जेव्हा तुम्हाला एखादा स्नॅप्स येतो त्यावेळेस तुम्ही उजव्या बाजूला स्वाईप करून त्या आवाजाचा अल्बम, गाण्याचे नाव आणि त्या कलाकाराचे नाव पाहू शकता. "हे गाणे प्ले करा" ही लिंक तुम्हाला तुमच्या आवडीच्या ऐकण्याच्या व्यासपीठासह स्पोटिफाय, Apple Music आणि साऊंडक्लाउड यावर पूर्ण गाणे ऐकावयास उपलब्ध करून देते.
स्नॅपचे आता अनेक वर्षांसाठीचे मुख्य आणि स्वतंत्र प्रकाशक आणि नावाजलेल्यांबरोबर करार झालेले आहेत त्यामध्ये वॉर्नर म्युझिक ग्रुप, मर्लिन (ज्यामध्ये त्यांचे नावाजलेले स्वतंत्र सदस्य आहेत), NMPA, युनिव्हर्सल म्युझिक पब्लिशिंग ग्रुप, वॉर्नर चॅपेल म्युझिक, कोबाल्ट आणि BMG म्युझिक पब्लिशिंग यांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, जस्टिन बीबर आणि बेनी ब्लांकोचे "लोनली" हे नवीन गाणे स्नॅपचॅटच्या खास गाण्यांच्या यादीत आज समाविष्ट झालेले आहे. स्नॅपचॅटर्स आता त्यांच्या नवीन नृत्याबरोबर कलात्मक स्नॅप्स निर्माण करू शकतात, त्यांच्या मित्रांबरोबर शेअर करू शकतात, आणि जेव्हा त्यांच्या आवडत्या गाणी ऐकण्याच्या व्यासपीठावर पूर्ण गाणे ऐकण्यासाठी येईल त्यावेळेस ही लिंक सेव्ह करून ठेऊ शकतात.
संगीताच्या पलीकडे, आम्ही स्नॅपचॅटर्सची स्वतःचे संगीत तयार करण्याची आणि ते आपल्या स्नॅप्समध्ये टाकण्याची क्षमता तपासात आहोत. या महीन्यामध्ये हे जागतिक पातळीवर उपलब्ध होणार आहे.
*Snap Inc. आंतरिक डेटा Q1 2020.
Back To News