Tap to View

Today marks a pretty big change for Snapchat — you no longer have to press and hold the screen to view a Snap or Story — instead, simply Tap to View! This means no more tired thumbs while watching a several-hundred-second Story… and a little getting used to for anyone who has been Snapchatting for a while. We think you’re going to love it!
आज Snapchat मध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे — आता स्नॅप किंवा स्टोरी पाहण्यासाठी स्क्रीन होल्ड करून ठेवायची गरज नाही त्यासाठी फक्त टॅप करा. त्यामुळे शेकडो सेकंदांची स्टोरी पाहण्यासाठी आता स्क्रीन होल्ड करून बोटांना ताण देण्याची आवश्यकता नाही जे काही काळापासून स्नॅपचॅटिंग करत आहेत त्यांना लगेचच याची सवय होईल. आम्हाला खात्री आहे हे तुम्हाला नक्कीच आवडेल!
नवीन मित्र करण्यासाठी जवळपासचे जोडा आणि त्यासारखे अजून बरेच मार्ग आहेत. जेव्हा तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत गप्पा मारायच्या असतील तेव्हा तुम्ही पटकन ग्रुप तयार करू शकता. जर सर्वानी जवळपासचे जोडा चालू केले तर तुमच्या स्क्रीन वर तुमच्या मित्रांची यादी दिसेल. जोडण्यासाठी फक्त टॅप करा.
Snapcodes मध्ये देखील एक महत्वपूर्ण बदल झाला आहे :) तुमच्या Snapcode च्या मध्यभागी तुम्ही सेल्फी टाकू शकता जेणेकरून तुमच्या मित्रांना तुम्ही त्यांना जोडले आहे हे सहज लक्षात येईल. जर इतर ॲप मध्ये Snapcode दिसला तर स्क्रीन शॉट घ्या. मित्र जोडा याच्या माध्यमातून तुम्ही स्क्रीनशॉट केलेले स्नॅपकोड जोडू शकता.
आणि सरते शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे आम्ही नुकतीच सादर केलेली दोन-घटक प्रमाणीकरण पद्धती ज्यामुळे Snapchat च्या सुरक्षेमध्ये वाढ झाली आहे तुम्ही त्या पद्धतीचा अवलंब केला की चुकीच्या पद्धतीने तुमचे खाते वापरू इच्छित असलेल्या लोकांना ते करणे दुष्कर होईल.
Back To News