Our Biggest Update Yet: v4.0 Phantom

It’s been a busy couple of months at Snapchat. With over 50 million snaps shared every day, we’ve had to do a lot of work to make sure our service can continue to support a growing community of snappers. Today, we’re thrilled to announce a major update to our iPhone application – video snaps!
Snapchat मध्ये काही महिने खूप व्यस्त गेले. जेथे प्रतिदिन 50 मिलियन स्नॅप शेअर केले जातात, आमच्या सेवेने स्नॅपर यांचा वाढता समुदायाचे समर्थन करणे सुरू ठेवण्याची खात्री करण्यासाठी आम्हाला खूप काम करावे लागले आहे. आज, आम्ही आमच्या iPhone ॲप्लिकेशनला एक महत्त्वाच्या अद्यतनाची घोषणा करण्यात आनंद होत आहे – व्हिडिओ स्नॅप!
Snapchat म्हणजेच घडणारे क्षण शेअर करणे, आणि त्या क्षणांना व्हिडिओ मध्ये कैद करणे हा एक छान मार्ग आहे.  दुर्दैवाने बऱ्याचशा कॅमेरा अॅप्लिकेशन तुम्ही तुमचा कॅमेरा फोटो वरून व्हिडिओ मोड वर आणेपर्यंत तो क्षण निघून गेलेला असतो.  हे खूप निराशाजनक आहे.  त्यामुळे आम्ही काहीतरी वेगळं निर्माण केलं – आणि आम्हाला वाटते त्याने फार मोठा फरक पडेल. 
फोटो आणि व्हिडिओ सेटिंग साठी पुढे मागे झुंजण्यापेक्षा, आम्ही यांना एका बटणावर एकत्रित केले आहे. जर तुम्हाला फोटो काढायचा असेल, फक्त हे बटण दाबा.  जर तुम्हाला व्हिडिओ काढायचा असेल, हे बटण खाली दाबून ठेवा.  जेव्हा तुमचे रेकॉर्डिंग पूर्ण होईल, तुमचे बोट बटणावरून काढा. एकदम सोपे. व्हिडिओ स्नॅप्स हे १० सेकंदाचे असतात, आणि फोटो स्नॅप्स सारखेच, अॅप्लिकेशनमध्ये एकदाच दिसतात. 
हे फक्त इतकेच नाही – ह्या अपडेटमध्ये खूप छान गोष्टी आहेत.  पूर्ण स्क्रीन दिसण्याबरोबरच फोटो/व्हिडिओ काढणे आणि पाठवणे हे अत्यंत वेगाने होईल आणि लँडस्केप कॅप्शनही दिलेला आहे (फक्त तुमचा iDevice आडवा करा!) आणि कोण तुम्हाला स्नॅप पाठवू शकेल हे ठरविण्यासाठी नवीन सेटिंग पेज तुमच्या मदतीला आहे.
नेहमीप्रमाणेच तुमच्या अभिप्रायांचे स्वागत करतो! आम्हाला फक्त हाय! म्हणायचे असेल किंवा काही मदत हवी असल्यास support@snapchat.com या ई-मेल आयडी वर ई-मेल पाठवू शकता. 
Back To News