Who Can View My Snaps and Stories

Two questions we get a lot are “do you keep all of the Snaps?” and “do you look at them?” An earlier blog post detailed how Snaps are stored and when they are deleted, so now with the introduction of Stories, we’d like to share a bit about access.
आम्हाला दोन प्रश्न अनेकवेळा पडतात की “आपण सर्व Snaps ठेवतात का ?” आणि “तुम्ही ते पाहता का?” या आधीच्या ब्लॉग पोस्टमध्ये स्नॅप्स कसे साठविले जातात आणि ते केव्हा ते डिलीट केले जातात याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली होती, तर आता स्टोरीज सादर केल्यानंतर, आम्हाला त्याच्या वापराबद्दल सांगायला आवडेल.
स्टोरेज
आमच्या मागील ब्लॉग पोस्टमध्ये नमूद केल्यानुसार, स्नॅप्स त्यांच्या प्राप्तकर्त्यांद्वारे उघडले गेल्यावर मग ते आमच्या सर्व्हरवरून डिलीट केले जातात. तर मग ते उघडण्यापूर्वी त्यांच्याबाबत काय घडते? स्नॅपचॅटचे बहुतांश इन्फ्रास्ट्रक्चर हे गुगलच्या ॲप इंजिन या क्लाऊड कॉम्प्युटिंग सेवेवर होस्ट करण्यात आले आहेत. न उघडल्या गेलेल्या स्नॅप्ससह आमचा बहुतेक डेटा हा तो जोवर डिलीट होत नाही तोपर्यंत ॲप इंजिनच्या डेटास्टोअरमध्ये ठेवला जातो.
पुनर्प्राप्ती
Snapchat ला न उघडलेले स्नॅप्स डेटास्टोअरमधून पुनर्प्राप्त करणे शक्य आहे का? होय—जर आम्ही डेटास्टोअरमधून स्नॅप्स पुनर्प्राप्त करू शकलो नाही, तर आम्ही प्रेषकाला इच्छित असलेल्या प्राप्तकर्त्यांपर्यंत ते पोहोचवू शकणार नाही. सामान्य परिस्थितींमध्ये आम्ही वैयक्तिकरित्या स्नॅप्सना पुनर्प्राप्त करून पाहतो का? नाही. स्नॅप्सना त्यांच्या प्राप्तकर्त्या(र्त्यां)पर्यंत पोहोचविण्याची सामान्य प्रक्रिया स्वयंचलित आहे.
जेव्हा आम्ही एखाद्या स्नॅपला तो उघडला गेला नसल्याचे गृहीत धरून वैयक्तिकरित्या पुनर्प्राप्त करतो अशा परिस्थितीत काय केले जाते? उदाहरणार्थ, असेही प्रसंग उद्भवतात जेव्हा इतर इलेक्ट्रॉनिक संवाद सेवा प्रदात्यांप्रमाणेच आम्हाला माहिती ॲक्सेस करून उघड करण्याची परवानगी असते आणि कधीकधी कायद्याने सक्ती केलेली असते. उदाहरणार्थ, जर आम्हाला स्नॅप सामग्री आणि जे स्नॅप्स आमच्या सर्व्हरवर आहेत अशा स्नॅप्सबद्दल कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या खात्याकडून तपासणी परवाना मिळाला, तर फेडरल कायदा इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन प्रायव्हसी कायद्याची (ECPA) मागणी करतात आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या खात्यासाठी स्नॅप्स तयार करणे आमच्यासाठी बंधनकारक असते. अधिक माहितीसाठी, आमच्या गोपनीयता धोरणांच्या भागामध्ये पहा जिथे कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही माहिती उघड करू शकतो याची चर्चा केलेली असते.
मे 2013 पासून, आम्हाला प्राप्त झालेल्या अंदाजे डझनभर सर्च वॉरंट्समुळे आम्हाला कायदा अंमलबजावणी विभागाकडे न उघडलेले स्नॅप्स सादर करावे लागले आहेत. दररोज पाठविल्या जाणाऱ्या 350 दशलक्ष स्नॅप्सपैकी ते आहेत.
कायदा अंमलबजावणी विभाग कधीकधी आम्हाला स्नॅप्स काही कालावधीकरता राखून ठेवण्याची विनंती करतात, जसे की कायदा अंमलबजावणी विभागाकडून स्नॅप्ससाठी सर्च वॉरंट जारी करायचे की नाही हे जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत ते ठेवणे.
न उघडलेल्या स्नॅप्सना वैयक्तिकरित्या उघडण्यासाठी वापरावयाच्या टूलचा ॲक्सेस सध्या कंपनीमधील आपले सह-संस्थापक व CTO बॉबी (ज्याने त्याचे कोडिंग केले आहे) आणि मी अशा केवळ दोन व्यक्तींकडेच आहे.
ठीक आहे, मग स्टोरीजच्या बाबतीत काय घडते?
स्टोरीज आणि स्नॅप्स यांच्यामधील सर्वात मोठा फरक म्हणजे जोवर वापरकर्त्याद्वारे स्टोरीज डिलीट केल्या जात नाहीत तोवर त्या 24 तासांसाठी उपलब्ध असतात आणि या कालावधीत वारंवार पाहिल्या जाऊ शकतात. जोपर्यंत उघडले जात नाहीत तोपर्यंत किंवा 30 दिवस होऊन अद्याप उघडले नसल्यास तोवर साठवून ठेवल्या जाणाऱ्या न उघडलेल्या स्नॅप्सप्रमाणे न होता, तुमच्या स्टोरीजमध्ये समाविष्ट केलेले स्नॅप्स 24 तासांनंतर आमच्या सर्व्हरवरून डिलीट केले जातात. स्टोरीजच्या ॲक्सेस आणि त्या उघड करण्यासंदर्भात, स्नॅप्सच्या बाबतीत वर वर्णन केल्याप्रमाणेच समान कायदेशीर आवश्यकता लागू होतात.
समुदाय मार्गदर्शक तत्त्वे
आमच्या वापरण्याच्या अटी आणि समुदाय मार्गदर्शक तत्वे तुम्हाला स्नॅपचॅट वापरण्याचे नियम माहित करून देतात. जर एखादा वापरकर्ता नियम मोडत असल्याची तक्रार आमच्याकडे आल्यास त्यांनी पोस्ट केलेल्या स्टोरीचे पुनरावलोकन आम्ही करू शकतो आणि त्यानुसार योग्य कारवाई करू शकतो. यामध्ये स्टोरी डिलीट करणे, खात्यावर इशारावजा सूचना दर्शविणे किंवा अगदी खाते बंद करण्यापर्यंतची कारवाईदेखील समाविष्ट असू शकते.
आमच्या पद्धतींबद्दल अधिक माहिती आमच्या गोपनीयता धोरणांमध्ये समाविष्ट आहे. आम्हाला आशा वाटते की या पोस्टमधून तुम्हाला आम्ही कसे संचालन करतो याची व्यवस्थित कल्पना आली असेल. तुमच्या सर्जनशीलता आणि उत्साहामुळे आम्ही सातत्याने विस्मयचकित होत आहोत. अशा सुंदर समुदायाची उभारणी केल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो.
Back To News