We Stand Together

Snap CEO Evan Spiegel sent the following memo to all Snap team members on Sunday, May 31. In it he condemns racism while advocating for creating more opportunity, and for living the American values of freedom, equality and justice for all.
त्यानंतर मला दक्षिण आफ्रिकेत काम करण्याची आणि अभ्यासाची संधी मिळाली जिथे मला माझा आवडता कलाकार - बिशप टूटूला भेटण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. मी वर्णद्वेष आणि वंशवादामुळे झालेला विनाशाचा साक्षीदार आहे, परंतु त्याचबरोबर प्रगती आणि सलोख्याच्या दिशेने केल्या जाणार्या अथक प्रयत्न देखील पाहिले. स्टॅनफोर्डमध्ये, शेवटच्या वर्षात मी उजमामध्ये, कॅम्पसमधील विद्यार्थी वसतीगृहात वास्तव्य केले, जे अश्वेत नागरिकांच्या समुदायाला समर्पित केलेले आहे (आणि ज्यात अश्वेत नागरिकांचे प्रमाण जास्त आहे). स्टॅनफोर्डमध्ये अत्याधिक प्रमाणात विशेषाधिकार असले तरीही, आपल्या समाजात दररोज वंशवादाशी संबंधित अन्यायांबद्दल शिकण्यासारखे बरेच काही मिळत होते.
मला संयुक्त राज्यातील अश्वेत नागरिकांच्या अनुभवाची चांगली माहिती आहे केवळ म्हणून मी आपल्याला हे सर्व सांगत नाही, तर मी आपल्याला समजवू इच्छितो की सुमारे 30 वर्षांपासून मी वैयक्तिकरित्या अमेरिका आणि जगभरात न्यायासाठी केल्या जाणार्या उत्कट आणि सातत्याने, योग्य तर्कानुसार आणि जोरदार अपील केल्याचा साक्षीदार आहे आणि त्यात सहभागी झालो आहे. 30 वर्षांनंतर, लक्षावधी लोकांनी बदलावासाठी आव्हान करून देखील, खूप कमी प्रगती झाली. अमेरिकेतील आर्थिक विषमतेने या शतकातील सर्वोच्च गाठला आहे, इतर जातीचे किराणा दुकानात किंवा जॉगिंग करू शकत नाहीत कारण त्यांना विनाकारण हत्या होण्याची भिती वाटते आणि स्पष्ट शब्दात सांगायचे तर, अमेरिकी प्रयोग अयशस्वी होत आहेत.
मी आपल्याला हे यासाठी सांगत आहे कारण मी जाणतो की, एमएलकेच्या शब्दात, ''ज्यांची कुचंबणा होते ते दंगल करतात'' आणि जी माणसे शतकांपासून शांततेने बदल घडविण्याच्या मताचे आहेत त्यांना स्वातंत्र्य, समान वागणूक आणि न्यायाच्या दृष्टिने असे काहीही प्राप्त झाले नाही ज्याचे अमेरिकेा दीर्घकाळापासून वचन देत आलेली आहे. आणि अमेरिकेने खूप पूर्वी सगळ्यांसाठी न्यायाचे वाचन दिले होते. मी समजू शकतो की दंगल माजविणाऱ्यांना आपण दुर्लक्षित आहोत असे का वाटले असेल.
Snapchat तयार केल्यानंतर, 2013 मध्ये स्टॅनफोर्ड वुमेन इन बिझनेस परिषदेत पहिल्यांदाच भाषण करण्यासाठी आमंत्रित केल्यावर, मी म्हणालो की ''मी एक तरूण, श्वेत, सुशिक्षित पुरूष आहे. मी खरोखरच, खूप भाग्यवान आहे. आणि आयुष्य खूप कठीण आहे.'' मला वाटले की आपल्या विशेषाधिकारांना नाव देणे आणि आपल्या समाजामध्ये पसरलेल्या अन्यायाचा स्वीकार करणे खूप आवश्यक आहे - विशेषत: स्त्री व्यावसायिकांच्या समोर ज्यांना दररोज अशा अन्यायांना सामोरे जावे लागते. आपले विशेषाधिकार स्वीकारणे माझ्यासाठी सर्वात प्रथम आवश्यक पाऊलो होते कारण असे केल्याने मला विचार ऐकण्यात मदत झाली. एक प्रतिष्ठित, श्वेत पुरूष म्हणून माझे अनुभव हे स्पष्टपणे आमच्या सोबतच्या अमेरिकन लोकांनी अनुभवलेल्या अन्यायांपेक्षा वेगळे होते. माझ्यापेक्षा भिन्न लोकांची परिस्थिती समजून घेतल्याने संघर्षात एक उत्तम साथीदार होण्यात मला मदत मिळाली.
आपल्या देशाची निर्मिती या मूळ विचारधारेवर करण्यात आलेली होती की, तुमच्या जन्माच्या वेळेची परिस्थिती तुमच्या आयुष्याचे पूर्वनिर्धारण करत नाही. देव एका व्यक्तीला निवडून राजा बनवितो ही आपल्या पूर्वजांनी सांगितलेली युक्ती हास्यास्पद आहे- देव आपल्या सगळ्यांना निवडतो आणि सगळ्यांना समानतेने प्रेम देतो. त्यांची असा समाज निर्माण करण्याची इच्छा केली ज्यात देवाचे प्रेम प्रतिबिंबित होईल आणि आपल्या सगळ्यांमध्ये देवाचा वास असेल. आपल्यापैकी कोणालाही कमी किंवा जास्त प्रमाणात प्रेम मिळावे असे देवाला वाटत नाही.
नक्कीच, ज्यांनी सर्वांसाठी स्वातंत्र्य, समान वागणूक आणि न्यायाचे समर्थन केले तेच संस्थापक - प्रामुख्याने गुलामगिरीचे मालक होते. त्यांची लोकांद्वारे, लोकांसाठी निर्मित राष्ट्राची मजबूत कल्पना ही पूर्वाग्रह, अन्याय आणि वंशवादावर आधारित होती. या ढासळलेल्या पायाची दुरुस्ती केल्याशिवाय आणि सर्वांसाठी समान संधी निर्माण करण्याच्या त्याच्या अपयशाच्या सातत्यामुळे, आपण मानवी प्रगतीसाठी आवश्यक असलेली आपली योग्य क्षमता प्राप्त करण्यास स्वत:ला रोखत आहोत - आणि आपण सर्वांसाठी स्वातंत्र्य, समान वागणूक आणि न्यायाचा स्पष्ट दृष्टिकोन प्राप्त करण्यात अपयशी होत आहोत.
माझे मित्र, टीमचे सदस्य, पत्रकार आणि भागीदार सहसा मला विचारत असतात की बदल घडून आणण्यासाठी आपण काय करू शकतो. मी कोणी तज्ञ नाही आणि माझे वय 29 वर्षे आहे आणि मला अजूनही या जगात भरपूर गोष्टी शिकायच्या, जाणून घ्यायच्या आहेत हे लक्षात घेऊन, मी माझ्या स्वत:चे मत आणि दृष्टिकोन खाली शेअर करून सांगितले आहे की अमेरिकेत बदल घडून आणण्यासाठी काय करणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपण सर्व प्रकारच्या पार्श्वभूमीवरील लोकांसाठी समान रूपात संधी निर्माण करत नाही तोपर्यंत प्रणालीकृत वंशवाद समाप्त करू शकत नाही.
मला असे वाटते की सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाची पायरी ही आहे की आपल्याला राष्ट्र म्हणून आपल्या मूलभूत तत्वांशी वचनबद्धता पुन्हा पुष्टी केली पाहिजे: स्वातंत्र्य, समान वागणूक, न्याय, आयुष्य, स्वाधीनता आणि आनंदाचा शोध. भविष्यात यश मिळविण्यासाठी आपण एकत्रितपणे एक सामायिक दृष्टिकोन तयार करणे आवश्यक आहे आणि पुढच्या पिढीसाठी आपल्याला कसा अमेरिका हवा ते परिभाषित केले पाहिजे. या प्रक्रियेत सर्व अमेरिकन लोकांना सामील केले जावे आणि जी ''लोकांद्वारे, लोकांसाठी'' असली पाहिजे. आपण राष्ट्राला आपल्या इच्छेनुसार परिभाषित करू शकल्यास, आपण पुढील पाऊले उचलू शकतो आणि सामायिक दृष्टिकोन वास्तविकतेमध्ये आणण्यासाठी तत्वांसह आवश्यक निर्णय घेऊ शकतो.
जीडीपी किंवा शेअर बाजारासारख्या मूर्खपणाच्या अल्प मुदतीच्या मॅट्रिक्सपेक्षा आपल्या मूल्यांची पूर्तता करण्यासाठी आपण आपले यश परिभाषित करण्यास देखील सुरुवात केली पाहिजे. जेव्हा आपल्या स्वास्थ्य दक्षतेचा खर्च वाढतो तेव्हा आपल्याला प्राप्त होत असलेल्या मूल्यांना विचारात न घेता, जीडीपी मध्ये वाढ होते. जर चक्रीवादळ आले आणि प्रचंड प्रमाणात घरे नष्ट झाली तर त्यामुळे आपल्याला त्यांचे पुनर्निर्माण करावे लागते त्यानंतर, जीडीपी मध्ये वाढ होते. जीडीपी मूळत: एक खंडित मॅट्रिक आहे जे मनुष्याचा खरा आनंद कशात आहे हे सांगत नाही. आनंदाचा शोध हा धनाच्या शोधाच्या पलीकडे असला पाहिले.
आपण सत्य, सलोखा आणि दुरुस्ती यावर एक विविधतापूर्ण, पक्षपातरहित आयोग स्थापित केला पाहिजे. आपण अमेरिकेच्या अश्वेत समुदायाचे विचार ऐकणारी, भेदभाव आणि पूर्वाग्रहासाठी गुन्हेगारीच्या न्याय प्रणालीची चौकशी करणारी, न्याय विभागाच्या नागरी अधिकार विभाग मजबूत करणारी आणि सलोखा आणि सुधारणांसाठी आयोगाने केलेल्या शिफारसींवर कारवाई करणारी प्रक्रिया सुरू केली पाहिजे. अत्याचार होऊन देखील अशाच प्रकारे प्रक्रिया लागू करण्याचे धैर्य दाखवणार्या जगभरातील लोकांकडून शिकण्यासारखे बरेच काही असते आणि आपण एक अशी प्रक्रिया तयार केली पाहिजे जी अमेरिकन तत्वांना प्रतिबिंबित करतो आणि राष्ट्राला आवश्यक बदल घडवून आणण्यात आणि भरपाई करण्यात मदत करेल.
आपण शिक्षा, आरोग्य आणि निवासमध्ये गुतवणूक करून ''संधी इंजिन'' पुनरारंभ करणे आवश्यक आहे जेणेकरून स्वतंत्र आणि निष्पक्ष समाजासाठी या मूलभूत गरजा सर्व लोकांना सहज आणि परवडण्याजोगे दिले जाऊ शकते.
मला वाटते की 1980 च्या दशकापासून अमेरिकेतील उद्योजकतेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घट झाली आहे याचे कारण पुरेशा प्रमाणात सामाजिक सुरक्षा नेटची कमतरता आहे. उद्योजकता ही त्या लोकांवर आधारित असते जे लोक व्यवसाय सुरू करण्यासाठी जोखीम घेतात, जे काही सुरक्षा नेटशिवाय जवळजवळ अशक्य आहे जसे की माझ्याकडे आहे. आजचे भावी उद्योजक हे विद्यार्थ्यांसाठीच्या कर्जात बुडालेले असतात आणि ज्यांना मर्यादित पगार आणि वाढत्या खर्चाचा ताळमेळ बसवावा लागतो आणि ज्यामुळे ते व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवलाची बचत करू शकत नाहीत.
आपल्या पुढच्या पिढ्यांच्या फायद्यासाठी आपल्या देशाच्या भविष्यात गुंतवणूक करणे महाग असेल. आपल्याला अधिक प्रगतीशील आयकर प्रणाली स्थापित करण्याची आवश्यकता असेल आणि मोठ्या प्रमाणात संपत्ती कर आकारावा लागेल आणि व्यवसायांवर जास्तीत जास्त कराचे दर आकारावे लागतील. आपण भविष्यात गुंतवणूक करत असतानाच, आपल्याला सांघिक कमतरता देखील भरून काढावी लागेल जेणेकरून सातत्याने परिवर्तनशील जगात भविष्यात उत्पन्न होणार्या कोणत्याही बाह्य झटक्यांना सामोरे जाण्यासाठी आपण योग्यरित्या सज्ज राहू शकतो. थोडक्यात सांगायचे तर, माझ्या सारख्या लोकांनी अधिक कर द्यावा - आणि मला वाटते की आपल्या सर्वांसाठी फायदेशीर असलेला समाज तयार करण्यासाठी हे अगदी योग्य आहे.
यापैकी बरेच बदल हे थोड्या अवधीसाठी ''वाईट'' असू शकतात, परंतु हे परिवर्तन आपल्या देशातील लोकांमध्ये केल्या जाणार्या दीर्घकालीन गुंतवणूकीसारखे आहेत, मला वाटते की भविष्यात सामुहिकरित्या याचा दीर्घकालीन भरपूर लाभ होईल.
हे परिवर्तन अजूनपर्यंत का झाले नाही? माझ्या मते आपल्या शासनाच्या सर्व शाखांमध्ये बूमर सूपरमेजॉरिटीने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यामध्ये स्वारस्य दाखविल्यामुळे असे आहे. अनेक दशकांपासून आपले शासन एका रणनीतीनुसार आपल्या सर्वात महत्त्वाचे घटक, अर्थात बूमर्स वाढविण्यासाठी कर्ज-वित्तपुरवठा कर कपात करण्यास वचनबद्ध आहे. खरंतर, अमेरिकेत सुमारे ६०% घरगुती संपत्तीवर बूमरचा हक्क आहे. स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर, करोडपति लोकांनी सुमारे ३% वचक ठेवलेला आहे. सामाजिक सुरक्षिततेसह, उदाहरणार्थ, आम्ही एका अशा योजनेस वित्तपुरवठा करतो जी कोणत्याही प्रकारच्या साधनांच्या-चाचणीशिवाय अमेरिकन इतिहासातील काही सर्वात श्रीमंत लोकांना लाभ देते.
काही संशोधनामध्ये दर्शवितात की जुन्या पिढीला नव्या पिढीमध्ये त्यांचे प्रतिबिंब न दिसल्यास, ते त्यांच्या भविष्यात गुंतवणूक करण्यास कमी इच्छुक असतात. अमेरिकेत, बूमर पिढी सुमारे ७०% श्वेत आणि नवीन पिढीमध्ये सुमारे ५०% श्वेत आहेत. अमेरिकेचा लोकसांख्यिकीय बदल निश्चित आहे. त्यामुळे, प्रश्न असा आहे की आम्ही एकत्रितपणे कार्य करून असे राष्ट्र निर्माण करू शकतो का जेथे आमच्या मूलभूत मूल्ये उत्तरमरित्या प्रतिबिंबित होतात, जे आमच्या भूतकाळातील खोलवर जखमांवर मलम लावू शकते आणि व्यक्तीची ओळख किंवा जन्मस्थानाला महत्त्व न देता समान संधी देते.
Snapchat साठी, आम्ही अमेरिकेत अशा खात्यांना प्रमोट करू शकत नाही ज्यांचा संबंध वंशवादी हिंसा भडकवणार्या लोकांशी आहे, मग ते कृत्य आमच्याद्वारे किंवा इतर प्लॅटफॉर्ममार्फत केले गेलेले असो. आमचे सामग्री शोधण्याचे व्यासपीठ हे खास व्यसपीठ आहे जेथे काय जाहिरातीत द्यायचे हे आम्ही ठरवितो. आम्ही सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी कठोर परिश्रम करण्याबद्दल वारंवार बोलत आहोत आणि आम्ही Snapchat वर जे बोलत आहोत तेच प्रचारित सामग्रीसह मांडत राहू. जोपर्यंत Snapchat वरील खात्यांवर प्रसारित केला जाणारा मजकूर हा आमच्या समुदायाच्या मार्गदर्शक दिशानिर्देशांनुसार असेल तोपर्यंत आम्ही कदाचित विभाजक लोकांना Snapchat चे खाते सुरू ठेवण्याची परवानगी ही देऊ, परंतु आम्ही या खात्याची किंवा त्यावर प्रसारित केल्या जाणाऱ्या मजकुराची कधीही जाहिरात करणार नाही.
आपले मार्ग प्रेमाकडे वाळविण्यास कधीही उशीर झालेला नाही, आणि ही माझी प्रामाणिक आणि खरी आशा आहे की आपल्या या महान देशाचे नेतृत्व आपण संस्थापित केलेल्या तत्वांवर, आपल्या स्वातंत्र्य, समता आणि सर्वांसाठी न्याय या मूल्यांवर काम करेल.
जेव्हा वर्णभेद, हिंसाचार आणि अन्याय अशा गोष्टी समोर येतील तेव्हा आम्ही आमच्या कृतीमधून हे नेहमीच स्पष्ट करू की अशा गोष्टींसाठी इथे कोणतीही जागा नसेल, आणि आम्ही कधीही त्याची जाहिरात करणार नाही तसेच आमच्या व्यासपीठावर कधीही त्या गोष्टींस पाठिंबा देणार नाही.
याचा अर्थ असा होत नाही की आम्ही ज्यांच्या मताशी सहमत नाही अशा लोकांनी लिहिलेले लिखाण काढून टाकू किंवा जे काही व्यक्तींशी असंवेदनशीलरित्या वागत आहेत त्यांचे खाते बंद करू. आपल्या देशाच्या आणि जगाच्या भविष्याबद्दल येथे बरेचसे वादविवाद होतात. परंतू, मानवी जीवनाचे मूल्य आणि जे सतत स्वातंत्र्य, समता आणि न्यायासाठी आग्रही आहेत अशा महत्वाच्या गोष्टींबद्दल वादविवाद करण्यासाठी आपल्या देशामध्ये जागा नाही. जे नेहमी शांतता, पेम आणि न्यायाच्या बाजूने उभे राहतात त्याच्या बाजूने आम्ही नेहमीच आहोत, आम्ही आमचे व्यासपीठ वाईट पसरविण्यापेक्षा चांगल्याला प्रोत्साहन देण्यासाठी वापरू.
हे मला माहित आहे की असेही खूप लोक आहेत ज्यांना असे वाटते की आपल्या समाजामध्ये फक्त "काही व्यक्ती" वर्णभेदी, किंवा फक्त काही ठिकाणी "अन्याय "आहे याचा अर्थ "आपण सगळे वाईट" आहोत असा होत नाही. माझ्या मते माणुसकी ही परस्परांशी जोडलेली आहे त्यामुळे आपल्यापैकी कोणीही दुखावले गेले तर आपल्या सगळ्यांना दुःखाला सामोरे जावे लागते. जेव्हा आपल्यापैकी कोणीही उपाशी असेल तर आपल्या सगळ्यांना भुकेची जाणीव असते. आणि जेव्हा आपल्यापैकी कोणीही गरीब असेल तेव्हा आपल्याला त्यांच्या गरीब असण्याची जाणीव असते. जेव्हा आपले मौन कोना एका व्यक्तीला अन्याय करण्यासाठी सक्षम बनविते त्यावेळेस आपण एक आदर्श राष्ट्र निर्माण करण्यामध्ये अपयशी ठरलेले आहोत असे समजावे.
समता आणि न्याय यांना पाठिंबा देण्याऱ्या संस्थांना Snap मदत करते अशी विचारणा आपल्यापैकी बऱ्याच जणांकडून झालेली आहे. आणि याचे उत्तर हो असे आहे. परंतू, माझ्या अनुभवातून मी मी सांगू शकतो की, आपल्यावर झालेल्या अन्यायाला परोपकार म्हणजे फक्त एक छोटे ठिगळ लावल्यासारखे आहे. जरी आमचे कुटुंब वंचितांसाठी अर्थपूर्ण योगदान करण्याची संधी निर्माण करीत असतील,आणि न्यायाच्या रक्षकांचे दान देत असतील तरी अशी परिस्थिती आपल्या समाजाची संपूर्ण पुनर्रचना करणे गरजेचे असल्याची जाणीव करून देते. खाजगीरित्या केलेले परोपकार हे परिस्थितीला ठिगळ लावू शकते किंवा प्रगतीला गती देऊ शकते, परंतू एकट्याने ही अन्यायाची खोल आणि मोठी भगदाडे बजावू शकत नाहीत. एक संयुक्त राष्ट्र बनून आपण ही दारी एकत्रितरित्या पार करू शकतो. स्वातंत्र्य, समता आणि सर्वांसाठी न्याय याकरिता आपण एकत्र येऊन प्रयत्नशील राहू.
आपल्यासमोर खूप मोठी आव्हाने आहेत. अन्याय आणि हिंसाचाराचा मोठा वारसा असलेल्या अमेरिकेमध्ये –जॉर्ज अहमूद आणि ब्रेओंना हे अगदी आत्ताचे बळी आहेत आणि न पुढे आलेले आणखी बरेच बळी आहेत – आपण यामध्ये गहाण बदल घडविले पाहिजेत. केवळ आपल्या देशांमध्येच बदल घडविला पाहिजे असे नाही तर तो आपल्या अंतःकरणामध्येही घडला पाहिजे. आपण सर्व मानव जातीला शांततेचा प्रकाश दिला पाहिजे आणि प्रेमाचे आलिंगन दिले पाहिजे.
तुम्ही शांततेत असावे ही सदिच्छा,
इव्हान
Back To News