आज, जागतिक मानसिक आरोग्य दिनानंतर, हेडस्पेस मिनीमार्फत दोन नवीन इन-अॅप मेडिटेशन्स रिलीज करण्यासाठी आम्ही हेडस्पेससह एकत्र येत आहोत -- अशी एक सुरक्षित जागा जेथे आपले मित्र मेडिटेशन्स आणि व्यायामाचा मनसोक्त सराव करू शकतील आणि एकमेकांना Snapchat मार्फत पाहू शकतील.
चिंता, उदासिनता, आणि इतर मानसिक आव्हानांशी झुंजत असलेल्या स्नॅपचॅटर्सना, आमच्या समुदायाला या समस्यांचा कसा अनुभव येत आहे याचे मागील वर्षी संशोधन करूनमिळवलेल्या माहितीच्या आधारावर अधिक चांगला आधार देण्यासाठी आम्ही हेडस्पेस मिनी विकसित केले आहे. आम्हाला आढळले आहे की, बऱ्याच स्नॅपचॅटर्सना तणावाचा आणि चिंता ग्रासते आणि व्यावसायिक सल्लागार किंवा त्यांच्या पालकांपेक्षा सगळ्यात आधी त्यांचे मित्र असतात जे त्यांची मदत करतात. आम्ही त्यांना त्यांच्या मित्रांसह वापरण्यासाठी नवीन प्रतिबंधात्मक उपयुक्त कल्याणकारी साधने देऊ इच्छितो,आणि आधीच त्या ठिकाणी ते दिवसातून बर्याच वेळा एकमेकांशी संवाद साधत आहेत.
आता, कोविड-१९ पँडेमिकमध्ये बरेच महिने राहिल्यानंतर स्नॅपचॅटर्स यावर्षी व्हर्च्युअली शाळेची सुरुवात करीत आहेत किंवा वर्क फ्रॉम होम करीत आहेत, संकटाचा त्यांच्यावर कसा परिणाम होत आहे हे आम्हाला अधिक चांगले जाणून घ्यायचे होते.
आम्ही युनायटेड स्टेट्स, यूके आणि फ्रान्समधील तरुणांना तणाव आणि अनिश्चितता याचा कसा अनुभव येत आहे याविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही ग्रुपसॉल्व्हरद्वारे सर्वेक्षण केले. त्या प्रत्येक विभागांमध्ये, कोविड -19 च्या प्राथमिक स्तरामुळे बहुतेक स्नॅपचॅटर्स तीव्रतेने तणावग्रस्त असल्याचे परिणाम दर्शवितात:
मागील वर्षापेक्षा यावर्षी स्नॅपचॅटर्स अधिक तणावग्रस्त आहेत आणि सतत ताणतणावाचा अनुभव त्यांना येत आहे - यूएसमधील 73% स्नॅपचॅटर्सनी असे म्हटले आहे की गेल्या आठवड्यात ते तणावग्रस्त होते, त्यानंतर ब्रिटनमध्ये 68% आणि फ्रान्समध्ये 60% स्नॅपचॅटर्स तणावग्रस्त आहेत.
कोविड -19 हे तणावाचे एक प्रमुख कारण आहे ( स्नॅपचॅटर्सपैकी 85%, यूकेमध्ये,87% आणि फ्रान्समध्ये 80% यूएसमध्ये), त्यानंतर अर्थकारण (यूएसमध्ये 81%, यूकेमध्ये 77% आणि फ्रान्समध्ये 76%) आणि काम/करिअर प्रेशर (यूएसमध्ये 80% आणि यूके आणि फ्रान्समध्ये 77%). निवडणूक/राजकारण हे देखील यूएस स्नॅपचॅटर्ससाठी तणावाचे महत्त्वपूर्ण कारण आहे - 60% स्नॅपचॅटर्स असे नमूद करतात की ते त्यांच्या तणाव पातळीमध्ये वाढ करतात.
अमेरिकेत जनरेशन झेड स्नॅपचॅटर्ससाठी (13-24), शाळा त्यांच्यासाठी तणावाचे एक मुख्य कारण आहे (13-24 साठी 75% आणि 13-17 साठी 91%), कोविड -19 मधील व्यत्ययांमुळे मोठी चिंता निर्माण झाल्यामुळे त्यांच्या समवयस्कांशी भेटीगाठी नसल्याने ते शिक्षणात मागे पडले आहे.
या मानसिक ताणतणावामुळे त्यांच्या भावनिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे यूएस स्नॅपचॅटर्स सांगतात - 60% लोक चिंताग्रस्त, 60% थकलेले आणि 59% दबलेल्या भावनांमध्ये आहेत. जवळपास 50% लोकांनी अस्वस्थता जाणवते आणि 43% डोकेदुखीचा त्रास अनुभवत असल्याचे सांगितले.
यूएसमधील स्नॅपचॅटर्सपैकी अंदाजे एक तृतीयांश आणि यूके व फ्रान्समधील पाच टक्के वापरकर्ते ताणतणावाचा सामना करण्यासाठी ध्यान धारणा करतात, हे लक्षात घेऊन आम्ही काही बाबींवर थेट लक्ष ठेवण्यासाठी नवीन हेडस्पेस मार्गदर्शित मेडिटेशन सादर करीत आहोत:
“दयाळूपणा निवडा” - दयाळूपणा दाखवण्यावर लक्ष केंद्रित करणारे एक लहान मेडिटेशन जे आपण जगात कसे वावरतो आणि आपण इतरांशी कसे वागतो हे बदलू शकते. अंदाधुंदी, गोंधळ आणि संघर्षाच्या दरम्यान, हे ध्यान आपली मानसिकता बदलण्यासाठी आणि करुणेला आत्मसात करण्यासाठी बनवलेले आहे.
"टेक ऑन द स्कुल इअर" अनिश्चिततेला दिशा देण्यासाठी त्यावर लक्ष केंद्रित एक मिनी मेडिटेशन. विद्यार्थी वर्गात परत येतील किंवा अजूनही घरीच असतील, काळजी, चिंता किंवा मित्रांकडून संपर्क तुटल्याची भावना असू शकते. हे मेडिटेशन तुम्हाला तुमच्या जाणिवेच्या जवळ राहण्यास आणि अनिश्चितता कमी करण्यासाठी विश्रांती घेण्यास मदत करण्यासाठी बनविलेले आहे.
आमचा विश्वास आहे की Snapchat आमच्या समुदायाच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. हिअर फॉर यू सारख्या आमच्या मानसिक आरोग्य स्त्रोतांच्या व्यतिरिक्त, आम्ही हे प्रयत्न करण्यासाठी आणि स्नॅपचट्टर्सला सपोर्ट शोधण्यासाठी आणि मित्रांशी संपर्क साधण्यात स्नॅपचॅटर्सना पाठिंबा देत पुढे जात आहोत .