
FTC सोबत आमचा करार
जेव्हा आम्ही Snapchat तयार करण्यास सुरुवात केली, तेव्हा आम्ही फोटोद्वारे संवाद साधण्याचा एक अनोखा, जलद आणि मजेदार मार्ग विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले होते. त्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आम्ही बरेच काही शिकलो. आम्ही शिकण्याचा एक मार्ग म्हणजे चुका करणे, त्या मान्य करणे आणि त्या सुधारणे. त्यापैकी एक म्हणजे आम्ही Snapchat समुदायाशी अधिक अचूकपणे संवाद साधत होतो. आज सकाळी आम्ही FTC सोबत एका संमती आदेशात प्रवेश केला आहे, जो आयोगाने उपस्थित केलेल्या चिंतांचे निराकरण करतो.
जेव्हा आम्ही Snapchat तयार करायला सुरुवात केली तेव्हाच आम्ही फोटो सह संवाद करण्याच्या एका अनोख्या, वेगवान आणि मनोरंजक सुविधा उपलब्ध करून द्यायची हे आमचे उद्दिष्ट होते. आम्ही त्या सुरुवातीच्या दिवसांत बरेच काही शिकलो. चुकणे, त्या समजून घेऊन त्यावर उपाय शोधणे हा शिकण्याचा एक मार्ग होता.
जेव्हा आमचे लक्ष निर्मिती वर होते तेव्हा काही गोष्टींकडे म्हणावे तितके लक्ष देता आले नाही. त्यापैकी एक म्हणजे आम्ही Snapchat समुदायाशी कसा संवाद साधला याबद्दल अधिक अचूक असणे हा होता. आयोगाने उपस्थित केलेल्या मुद्दे लक्षात घेत आम्ही आज सकाळी FTC सोबत एक सामंजस्य करार केला. आजचा करार करण्याआधीच आम्ही यातील बऱ्याच बाबींवर, आमचे गोपनीयता धोरण, ॲपची माहिती, आणि ॲपवर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांमध्ये मध्ये योग्य ते बदल करून उपाय शोधले आहेत. कोणताही गैरवापर टाळण्यासाठी आणि सुरक्षेसाठी आम्ही मोठ्याप्रमाणात खर्च करत आहोतच.
आम्ही वापरकर्त्याच्या गोपनीयतेला प्राधान्य देत स्नॅपचॅटर्सना त्यांनी कोणाशी आणि कसा संवाद करायचा याचे स्वातंत्र्य दिले आहे. हे आम्ही कायमच गंभीरपणे घेत आलो आहोत आणि भविष्यातही घेत राहू.