गोपनीयतेचे संरक्षण करणे हा लोकांना स्वतःला व्यक्त करण्याकरता सक्षम करण्यासाठी, येणारा क्षण जगता यावा यासाठी, जगाबद्दल शिकण्यासाठी आणि एकत्र मिळून मनोरंजन करता यावे हे आपले मिशन पूर्ण करण्यातील एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आपण कोण आहात, कोण होता किंवा आपण कोण असाल याऐवजी — आमच्यासाठी, आपण स्वतः असणे म्हणजेच स्वातंत्र्य असणे हे आहे.
म्हणूनच आम्ही Snapchat सह क्षणभंगुर मीडियाची कल्पना सादर केली - वास्तविक जीवनाप्रमाणेच, ज्यात आपण नेहमी रेकॉर्डवर नसतो. यामुळे गोपनीयता आणि अभिव्यक्तीची स्वतंत्रता मिळते. जेव्हा आपण एखाद्या नवीन व्यक्तीस भेटता तेव्हा आपण ही चिंता करू नये की ते तुमच्या जीवनातल्या गेल्या पाच वर्षातील वैयक्तिक रेकॉर्ड शोधून काढतील आणि त्यांचे विश्लेषण करतील.
आम्ही जे काही करतो त्याच्या मुळाशी आपला गोपनीयता आणि आपण कोणती माहिती शेअर करता ते निवडण्याचा अधिकार असतो. आणि म्हणूनच Snap ला जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (GDPR) च्या तत्त्वांचा स्वीकार करणे नैसर्गिकरित्या आले: डेटा कमी करणे, लहान धारणा कालावधी, अनामिकीकरण आणि सुरक्षितता.
उदाहरणार्थ, आम्ही नवीन Snapchat वैशिष्ट्य तयार करण्यापूर्वी, गोपनीयता विषयक वकील आणि अभियंते यांची एक समर्पित टीम आमच्या डिझाइनर्ससह पुढील रुपरेषेवर काम करते:
किती काळ आम्ही डेटा ठेऊ शकतो
कशापद्धतीने स्नॅपचॅटर्स त्यांचा डेटा पाहण्याच्या, वापरण्याच्या आणि हक्कांना बघतात.
डेटा साठविणे कशापद्धतीने कमी करता येईल
ज्या उद्दिष्टासाठी डेटा गोळा केला आहे तो इतर गोष्टींसाठी वापरला जात नाही याची कशी खात्री करून घ्याल
जेव्हा आम्ही माहिती संकलित करतो तेव्हा आम्ही कोणत्या प्रकारचा डेटा वापरतो याबद्दल विचारशील होण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, आम्ही आपली वांशिकता, लैंगिकता किंवा राजकीय निष्ठा याबद्दल माहिती संकलित करत नाही आणि आम्ही जाहिरातदार किंवा तृतीय पक्षाशी आपल्याबद्दल वैयक्तिकरीत्या ओळखण्यायोग्य माहिती शेअर करत नाही.
आम्ही संकलित केलेल्या काही माहितीमध्ये आपण Snapchat कुठे उघडता आणि डिस्कव्हरमध्ये आपण काय पाहता यासारख्या गोष्टी समाविष्ट असतात. ह्यामुळे आम्हाला आपल्याला त्या स्थानाशी संबंधित विशिष्ट अनुभव प्रदान करण्यात मदत करते तसेच आपल्याला "लाइफस्टाइल कॅटेगरीज" किंवा "कन्टेन्ट इंटरेस्ट टॅग" देखील प्रदान करता येतात. या इंटरेस्ट कॅटेगरीज आम्हाला आणि आमच्या जाहिरातदारांना आपल्यासाठी वैयक्तिकृत मजकूर देण्यात मदत करतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आम्हाला पुरविता त्या माहितीवर आपले नियंत्रण असावे अशी आमची इच्छा आहे. आपल्याला ज्या इंटरेस्ट कॅटेगरीज मध्ये नामांकित केले आहे त्यावर आपले पूर्ण नियंत्रण असते - आणि त्या सगळ्यातून तुम्ही आपली निवड रद्द करू शकता. आपल्याला जर आम्ही आपल्या स्थानाबद्दल माहिती वापरू नये असे वाटत असेल तर आपण आपल्या स्थानाशी निगडित परवानग्या बंद करू शकता. शेवटी, आपण आमच्या सेवांच्या बाहेरील पहिल्या आणि तृतीय-पक्षाच्या ऑडियन्स डेटा आणि क्रियाकलापांवर आधारित लक्ष्यित सर्व जाहिरातींमधून निवड रद्द करू शकता. आपण या सर्व परवानग्या Snapchat सेटिंग्जमध्ये शोधू शकता.
आपला डेटा कसा वापरला जात आहे हे पूर्णपणे समजून घेण्यासाठी एक ब्लॉग पोस्ट कधीच पुरेसा होणार नाही हे आम्हाला माहीत आहे. म्हणून आम्ही नुकतेच आमचे गोपनीयता केंद्र अपडेट केले आहे ज्यामुळे आम्हाला आशा आहे की आपल्याला समजण्यास सोप्या अशा भाषेत सर्वसमावेशक स्पष्टीकरण मिळेल. आपले इतर काही प्रश्न असल्यास, या लिंक वर आमच्यापर्यंत पोहोचण्यास अजिबात संकोच करु नका.
स्नॅपिंगसाठी शुभेच्छा!