१४ ऑक्टोबर, २०१४
१४ ऑक्टोबर, २०१४

तृतीय-पक्ष ॲप्लिकेशन्स आणि Snapchat API

गेल्या काही दिवसांपासून, Snaps सेव्ह करण्याची ऑफर देणाऱ्या वेबसाइटने त्यांचा डेटाबेस भंग झाल्याचे सूचित केल्यानंतर आम्ही आमच्या API आणि तृतीय-पक्ष ॲप्लिकेशन्सबद्दल अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. आम्ही आभारी आहोत की सेवा प्रदात्याने मान्य केले की Snapchat शी कधीही तडजोड झाली नाही, परंतु आम्ही या संधीचा उपयोग आमच्या समुदायासाठी हे तृतीय-पक्ष ॲप्लिकेशन्स निर्माण करू शकणारे दुर्दैवी धोके पुन्हा सांगण्यासाठी करू इच्छितो.

गेले काही दिवस आम्हाला API आणि थर्ड पार्टी ॲप्लिकेशन्स संदर्भात खूप प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली आहेत, खासकरून जेव्हा फोटो सुरक्षित करण्याची सुविधा देणार्‍या वेबसाइटने डेटाबेसचा भंग झाला असे सूचित केले. सेवा प्रदात्यानी हे Snapchat कधीही तडजोड केलेली नाही हे मान्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत, तसेच या गोष्टींबरोबर आम्ही हे पुन्हा सांगतो की हि थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन्स आमच्या समुदायासाठी काही धोके निर्माण करू शकतात

थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन्स म्हणजे असे ॲप्लिकेशन्स जे आमच्या कंपनीने तयार केलेले किंवा मेन्टेन केलेलं नाही तरीही Snapchat API मध्ये प्रवेश करू शकते असे ॲप्लिकेशन. Snapchat ला मिळत असलेली लोकप्रियता आणि आमच्या समुदायाचा होत असलेला विस्तार लक्षात घेता कॉटेज इंडस्ट्री ॲप-मेकर्स स्नॅप चॅटर्स ना अतिरिक्त सुविधा देण्यास उत्सुक आहेत यात काही नवल नाही. पण दुर्देवाने ही ॲप्लिकेशन्स Snapchat ची लॉगिन माहिती मागतात आणि त्याचा वापर करून खात्याविषयीची माहिती किंवा स्नॅप्सची देवाणघेवाण करतात.

जेव्हा तुम्ही अशा थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन्सला तुमची लॉगिन विषयक माहिती देता तेव्हा तुम्ही त्या डेव्हलपरला खरेतर एका गुन्हेगाराला तुमच्या वतीने तुमच्या खात्यात प्रवेश करायला आणि माहिती पाठवायला परवानगी देत असता.

एखादी विश्वसनीय थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन्स इकोसिस्टीम तयार करायला खूप वेळ आणि संसाधने लागतात. म्हणून तर आम्ही डेव्हलपर्सना सार्वजनिक API दिलेला नाही आणि खाजगी API ला आमची सुविधा वापरण्याची परवानगी देत नाही. आम्ही Snapchat प्लॅटफॉर्म बाबत वाढत असलेल्या प्रतिसादाबाबत खूप आनंदी आहोत पण त्याला सुयोग्य करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागणार आहे त्याबद्दल गैरसमज करू घेऊ नका तोवर कोणतेही ॲप्लिकेशन जे आमचे नाही परंतू Snapchat सुविधा देण्याचा दावा करत आहे ते आमच्या अटी व शर्तीचे उल्लंघन करत आहे आणि विश्वसनीय नाही.

Snapchat नेहमीच मित्रांसोबत स्नॅप्स ची देवाणघेवाण करण्याचे एक उत्तम ठिकाण आहे. आपला समुदाय सुरक्षित ठेवण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे सुरक्षा उपाय योजना आणि व्यवहार ज्ञान याचा एकत्रित वापर करणे आम्ही Snapchat सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यासाठी कार्यरत राहू आणि Apple  आणि Google  ला कळवून आमच्या API मध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन्स काढून टाकण्यास सांगू. थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन्सचा वापर करणे बंद करून तुम्ही आम्हाला मदत करू शकता.

बातम्यांवर परत जा