
आम्ही एकत्र उभे आहोत
Snap चे CEO इव्हान स्पीगल यांनी रविवार, 31 मे रोजी सर्व Snap टीम सदस्यांना खालील मेमो पाठवला. त्यात त्यांनी वंशवादाचा निषेध केला आहे आणि अधिक संधी निर्माण करण्याची आणि सर्वांसाठी स्वातंत्र्य, समानता आणि न्याय या अमेरिकन मूल्यांचे पालन करण्याची वकिली केली आहे.
प्रिय टीम,
गेल्या आठवड्यात लारा यांनी शेअर केल्याप्रमाणे, आम्ही जॉर्ज, अहमाउद, आणि ब्रेनोना यांच्या मृत्यूंची Snap फोकस मध्ये उद्या चर्चा करण्याचा विचार करत होतो, परंतु अमेरिकेमधील वांशिक हिंसा आणि अन्याय यांच्या दीर्घ वारशाशी मी झुंजत असताना, प्रतीक्षा करणे चुकीचे वाटले. वाईट आणि दुष्कृत्य करणाऱ्याबद्दल आपले गप्प राहणे दर मिनिटाला दृष्ट माणसांची हिम्मत वाढवत आहे. माझ्या भावना आपल्यासोबत शेअर करण्यासाठी प्रतिक्षा केल्याबद्दल मला क्षमा करा.
अमेरिकेत अश्वेत नागरिक आणि अन्य नागरिकांना दिल्या जाणार्या वागणूकीमुळे मला दु:ख झाले आणि खूप संतापलो आहे.
स्वातंत्र्य, समानता आणि न्यायासाठीच्या संघर्षाची मला लहानपणापासूनच जाणीव करून देण्यात आली. माझ्या वडिलांनी क्रिस्टोफर आयोगाचे प्रमुख सल्लागार म्हणून काम केले (आणि आमचे सुदैवाने, आमचे प्रमुख सल्लागार माइकने देखील आयोगामध्ये काम केले आहे), ज्याची निर्मिती 1991 मध्ये रॉडनी किंगसोबत झालेल्या मारहाणीनंतर लॉस एंजेलिस पोलिस खात्यात वंशवाद आणि अत्याधिक बळाचा वापर केल्याचा तपास करण्यासाठी करण्यात आली होती. आयोगाला वंशवाद मोठ्या प्रमाणात पसरला असल्याचे आणि अत्याधिक बळाचा वापर केला जात असल्याचे आढळले, जो उच्चपदस्थ अधिकारी नियंत्रित करू शकले नव्हते. सुमारे 30 वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या शिफारसी आज देखील भयानकपणे प्रासंगिक आहेत.
त्यानंतर मला दक्षिण आफ्रिकेत काम करण्याची आणि अभ्यासाची संधी मिळाली जिथे मला माझा आवडता कलाकार - बिशप टूटूला भेटण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. मी वर्णद्वेष आणि वंशवादामुळे झालेला विनाशाचा साक्षीदार आहे, परंतु त्याचबरोबर प्रगती आणि सलोख्याच्या दिशेने केल्या जाणार्या अथक प्रयत्न देखील पाहिले. स्टॅनफोर्डमध्ये, शेवटच्या वर्षात मी उजमामध्ये, कॅम्पसमधील विद्यार्थी वसतीगृहात वास्तव्य केले, जे अश्वेत नागरिकांच्या समुदायाला समर्पित केलेले आहे (आणि ज्यात अश्वेत नागरिकांचे प्रमाण जास्त आहे). स्टॅनफोर्डमध्ये अत्याधिक प्रमाणात विशेषाधिकार असले तरीही, आपल्या समाजात दररोज वंशवादाशी संबंधित अन्यायांबद्दल शिकण्यासारखे बरेच काही मिळत होते.
मला युनायटेड स्टेट्सच्या अश्वेत नागरिकांच्या अनुभवाची चांगली माहिती आहे केवळ म्हणून मी आपल्याला हे सर्व सांगत नाही, तर मी आपल्याला समजवू इच्छितो की सुमारे 30 वर्षांपासून मी वैयक्तिकरित्या अमेरिका आणि जगभरात न्यायासाठी केल्या जाणाऱ्या उत्कट आणि सातत्याने, योग्य तर्कानुसार आणि जोरदार अपील केल्याचा साक्षीदार आहे आणि त्यात सहभागी झालो आहे. 30 वर्षांनंतर, लक्षावधी लोकांनी बदलावासाठी आव्हान करून देखील, खूप कमी प्रगती झाली. अमेरिकेतील आर्थिक विषमतेने या शतकातील सर्वोच्च गाठला आहे, इतर जातीचे किराणा दुकानात किंवा जॉगिंग करू शकत नाहीत कारण त्यांना विनाकारण हत्या होण्याची भिती वाटते आणि स्पष्ट शब्दात सांगायचे तर, अमेरिकी प्रयोग अयशस्वी होत आहेत.
मी आपल्याला हे यासाठी सांगत आहे कारण मी जाणतो की, एमएलकेच्या शब्दात, "ज्यांची कुचंबणा होते ते दंगल करतात" आणि जी माणसे शतकांपासून शांततेने बदल घडविण्याच्या मताचे आहेत त्यांना स्वातंत्र्य, समानता आणि न्यायाच्या दृष्टीने असे काहीही प्राप्त झाले नाही, ज्याचे अमेरिका दीर्घकाळापासून वचन देत आलेली आहे. मी समजू शकतो की दंगल करणार्या लोकांना आपले विचार नीट का मांडता आले नाहीत.
Snapchat तयार केल्यानंतर, 2013 मध्ये स्टॅनफोर्ड वुमेन इन बिझनेस परिषदेत पहिल्यांदाच भाषण करण्यासाठी आमंत्रित केल्यावर, मी म्हणालो की "मी एक तरूण, श्वेत, सुशिक्षित पुरूष आहे. मी खरोखरच खूप भाग्यवान आहे. आणि आयुष्य खूप कठीण आहे." मला वाटले की आपल्या विशेषाधिकारांना नाव देणे आणि आपल्या समाजामध्ये पसरलेल्या अन्यायाचा स्वीकार करणे खूप आवश्यक आहे - विशेषतः स्त्री व्यावसायिकांच्या समोर ज्यांना दररोज अशा अन्यायांना सामोरे जावे लागते. आपले विशेषाधिकार स्वीकारणे माझ्यासाठी सर्वात प्रथम आवश्यक पाऊल होते, कारण असे केल्याने मला ऐकून घेण्यात मदत झाली. एक प्रतिष्ठित, श्वेत पुरूष म्हणून माझे अनुभव हे स्पष्टपणे आमच्या सोबतच्या अमेरिकन लोकांनी अनुभवलेल्या अन्यायांपेक्षा वेगळे होते. माझ्यापेक्षा भिन्न लोकांची परिस्थिती समजून घेतल्याने संघर्षात एक उत्तम साथीदार होण्यात मला मदत मिळाली.
आपल्या देशाची निर्मिती या मूळ विचारधारेवर करण्यात आली होती की, तुमचा जन्माच्या वेळेची परिस्थिती तुमच्या आयुष्याचे पूर्वनिर्धारण करत नाही. देव एका व्यक्तीला निवडून राजा बनवितो ही आपल्या पूर्वजांनी सांगितलेली युक्ती हास्यास्पद आहे - देव आपल्या सगळ्यांना निवडतो आणि सगळ्यांना समानतेने प्रेम देतो. त्यांची असा समाज निर्माण करण्याची इच्छा केली ज्यात देवाचे प्रेम प्रतिबिंबित होईल आणि आपल्या सगळ्यांमध्ये देवाचा वास असेल. आपल्यापैकी कोणालाही कमी किंवा जास्त प्रमाणात प्रेम मिळावे असे देवाला वाटत नाही.
नक्कीच, ज्यांनी सर्वांसाठी स्वातंत्र्य, समानता आणि न्यायाचे समर्थन केले तेच संस्थापक - प्रामुख्याने गुलामांचे मालक होते. त्यांची लोकांद्वारे, लोकांसाठी निर्मित राष्ट्राची मजबूत कल्पना ही पूर्वाग्रह, अन्याय आणि वंशवादावर आधारित होती. या ढासळलेल्या पायाची दुरुस्ती केल्याशिवाय आणि सर्वांसाठी समान संधी निर्माण करण्याच्या त्याच्या अपयशाच्या सातत्यामुळे, आपण मानवी प्रगतीसाठी आवश्यक असलेली आपली योग्य क्षमता प्राप्त करण्यास स्वत:ला रोखत आहोत - आणि आपण सर्वांसाठी स्वातंत्र्य, समान वागणूक आणि न्यायाचा स्पष्ट दृष्टिकोन प्राप्त करण्यात अपयशी होत आहोत.
माझे मित्र, टीमचे सदस्य, पत्रकार आणि भागीदार नेहमी मला विचारत असतात की, बदल घडून आणण्यासाठी आपण काय करू शकतो. मी कोणी तज्ञ नाही आणि माझे वय 29 वर्षे आहे आणि मला अजूनही या जगात भरपूर गोष्टी शिकायच्या, जाणून घ्यायच्या आहेत हे लक्षात घेऊन, मी माझ्या स्वतःचे मत आणि दृष्टिकोन खाली शेअर करून सांगितले आहे की अमेरिकेत बदल घडून आणण्यासाठी काय करणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपण सर्व प्रकारच्या पार्श्वभूमीवरील लोकांसाठी समान रूपात संधी निर्माण करत नाही तोपर्यंत प्रणालीकृत वंशवाद समाप्त करू शकत नाही.
सर्वप्रथम, माझ्या मते हे समजणे महत्त्वाचे आहे की, राष्ट्रपती रीगन आणि इतर लोकांनी आजच्या अमेरिकेला या "महान कल्पने"द्वारे परिभाषित केले होते की, प्रगतीचा आधार व्यवसाय असावा आणि शासनाने त्यात हस्तक्षेप करू नये. खरोखरच, कर कपात आणि नियंत्रणमुक्तीमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची वाढ होण्यास मदत झाली आणि संघराज्याच्या सरकारने आपल्या खर्चाची टक्केवारी संशोधन आणि विकास यांसारख्या भविष्याभिमुख प्रयत्नांवरून सामाजिक सुरक्षेसारख्या हक्कांकडे वळवली आहे. निश्चितच, शासकीय संशोधन आणि विकास ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे, परंतु याचे लाभ लवकरच मिळतात: यामुळे आधुनिक काळातील स्मार्टफोनमध्ये असलेल्या अनेक घटकांचा पाया रोवण्यात मदत केली आहे, ज्यामुळे आमच्यासारख्या व्यावसायिकांना प्रगती आणि यश प्राप्त झाले. केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पावरचे हे कच्चे (आणि अपूर्ण) गणित आहे - आम्ही प्रत्येक रांगेतील आयटमवर वादविवाद करू शकतो, अंदाजानुसार भविष्याकडे दुर्लक्ष करून भूतकालीन आणि वर्तमानातील गोष्टींकडे जास्त कल आहे:
आर्थिक वर्ष 2019 चा अर्थसंकल्पीय कार्यानुसार खर्च
एकूण अर्थसंकल्पाच्या %
भूतपूर्व/वर्तमान
औषधे
16.80%
सामाजिक सुरक्षा
15.79%
राष्ट्रीय संरक्षण
15.27%
आरोग्य
10.50%
निव्वळ व्याज
8.45%
उत्पन्न सुरक्षा
8.21%
सर्वसाधारण सरकार
5.81%
माजी सैनिकांचे फायदे आणि सेवा
3.13%
न्यायाचे प्रशासन
1.18%
कृषी
0.59%
अंदाजे एकूण वर्तमान/भूतपूर्व
85.73%
भविष्य
शिक्षण, प्रशिक्षण, सामाजिक सेवा
2.24%
नैसर्गिक संसाधने आणि पर्यावरण
1.05%
वाहतूक
1.73%
समुदाय आणि प्रादेशिक विकास
0.88%
समुदाय आणि प्रादेशिक विकास
0.56%
ऊर्जा
0.35%
अंदाजित एकूण भविष्य
6.81%
आमचा देश व्यवसायांना प्राथमिकता देतो ही गोष्ट लपून राहिलेली नाही. Snap ला या धोरणांचा खूप फायदा झाला आहे, परंतु माझ्या मते आता अमेरिकन लोकांना प्राधान्य देण्याची वेळ आली आहे.
मला विश्वास आहे की प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे, एक राष्ट्र म्हणून आपल्या मूलभूत मूल्यांप्रती आपली वचनबद्धता पुन्हा दृढ करणे: स्वतंत्रता, समानता, न्याय, जीवन, स्वातंत्र्य आणि आनंदाचा शोध भविष्यात यश मिळविण्यासाठी आपण एकत्रितपणे एक सामायिक दृष्टिकोन तयार करणे आवश्यक आहे आणि पुढच्या पिढीसाठी आपल्याला अमेरिका कशी हवी आहे ते परिभाषित केले पाहिजे. या प्रक्रियेत सर्व अमेरिकन लोकांना सामील करणारी आणि "लोकांद्वारे, लोकांसाठी" अशी प्रक्रिया असली पाहिजे. आपण राष्ट्राला आपल्या इच्छेनुसार परिभाषित करू शकल्यास, आपण पुढील पाऊले उचलू शकतो आणि सामायिक दृष्टिकोन वास्तविकतेमध्ये आणण्यासाठी तत्वांसह आवश्यक निर्णय घेऊ शकतो.
जीडीपा किंवा शेअर बाजार यांसारख्या खुळ्या अल्प मुदतीच्या मॅट्रिक्सपेक्षा आपल्या मूल्यांची पूर्तता करण्यासाठी आपण आपले यश परिभाषित करण्यास देखील सुरुवात केली पाहिजे. जेव्हा आपल्या आरोग्यसेवेचा खर्च वाढतो, तेव्हा आपल्याला प्राप्त होत असलेल्या मूल्यांना विचारात न घेता, जीडीपी मध्ये वाढ होते. जर चक्रीवादळ आले आणि प्रचंड प्रमाणात घरे नष्ट झाली, तर त्यामुळे आपल्याला त्यांचे पुनर्निर्माण करावे लागते त्यानंतर, जीडीपी मध्ये वाढ होते. जीडीपी मूलतः एक खंडित मेट्रिक आहे, जे मनुष्याचा खरा आनंद कशात आहे हे सांगत नाही. आनंदाचा शोध हा धनाच्या शोधाच्या पलीकडे असला पाहिले.
आपण सत्य, सलोखा आणि भरपाई यासाठी एक वैविध्यपूर्ण, पक्षपातरहित आयोग स्थापन केला पाहिजे. आपण अमेरिकेच्या अश्वेत समुदायाचे विचार ऐकणारी, भेदभाव आणि पूर्वाग्रहासाठी गुन्हेगारीच्या न्याय प्रणालीची चौकशी करणारी, न्याय विभागाच्या नागरी अधिकार विभाग मजबूत करणारी आणि सलोखा आणि सुधारणांसाठी आयोगाने केलेल्या शिफारसींवर कारवाई करणारी प्रक्रिया सुरू केली पाहिजे. अत्याचार होऊन देखील अशाच प्रकारे प्रक्रिया लागू करण्याचे धैर्य दाखवणार्या जगभरातील लोकांकडून शिकण्यासारखे बरेच काही असते आणि आपण एक अशी प्रक्रिया तयार केली पाहिजे जी अमेरिकन तत्वांना प्रतिबिंबित करतो आणि राष्ट्राला आवश्यक बदल घडवून आणण्यात आणि भरपाई करण्यात मदत करेल.
आपण शिक्षा, आरोग्य आणि निवासमध्ये गुतवणूक करून ''संधी इंजिन'' पुनरारंभ करणे आवश्यक आहे जेणेकरून स्वतंत्र आणि निष्पक्ष समाजासाठी या मूलभूत गरजा सर्व लोकांना सहज आणि परवडण्याजोगे दिले जाऊ शकते.
मला वाटते की, पुरेशा प्रमाणात सामाजिक सुरक्षा जाळ्याच्या कमतरतेमुळे 1980 च्या दशकापासून अमेरिकेतील उद्योजकतेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. उद्योजकता ही व्यवसाय सुरू करण्यासाठी लोक जोखीम घेण्यास किती सक्षम आहेत यावर अवलंबून असते, जे माझ्यासारखे सुरेक्षेच्या जाळ्याशिवाय करणे जवळपास अशक्य आहे. आजचे भावी उद्योजक हे विद्यार्थ्यांसाठीच्या कर्जात बुडालेले असतात आणि ज्यांना मर्यादित पगार आणि वाढत्या खर्चाचा ताळमेळ बसवावा लागतो आणि ज्यामुळे ते व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवलाची बचत करू शकत नाहीत.
आपल्या पुढच्या पिढ्यांच्या फायद्यासाठी आपल्या देशाच्या भविष्यात गुंतवणूक करणे महागडे असेल. आपल्याला अधिक प्रगतीशील आयकर प्रणाली स्थापित करण्याची आवश्यकता असेल आणि मोठ्या प्रमाणात संपत्ती कर आकारावा लागेल आणि व्यवसायांवर जास्तीत जास्त कराचे दर आकारावे लागतील. आपण भविष्यात गुंतवणूक करत असतानाच, आपल्याला सांघिक तूट देखील कमी करावी लागेल, जेणेकरून सातत्याने परिवर्तनशील जगात भविष्यात येणाऱ्या कोणत्याही बाह्य धक्क्यांना सामोरे जाण्यासाठी आपण अधिक चांगल्या प्रकारे सज्ज राहू शकू. थोडक्यात सांगायचे तर, माझ्या सारख्या लोकांनी अधिक कर द्यावा - आणि मला वाटते की आपल्या सर्वांसाठी फायदेशीर असलेला समाज तयार करण्यासाठी हे अगदी योग्य आहे.
यापैकी बरेच बदल हे थोड्या अवधीसाठी ''वाईट'' असू शकतात, परंतु हे परिवर्तन आपल्या देशातील लोकांमध्ये केल्या जाणार्या दीर्घकालीन गुंतवणूकीसारखे आहेत, मला वाटते की भविष्यात सामुहिकरित्या याचा दीर्घकालीन भरपूर लाभ होईल.
हे परिवर्तन अजूनपर्यंत का झाले नाही? माझ्या मते, आपल्या शासनाच्या सर्व शाखांमधील बूमर सूपरमेजॉरिटीने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यामध्ये स्वारस्य न दाखविल्यामुळे असे झाले आहे. अनेक दशकांपासून आपले सरकार एका विशिष्ट रणनीतीनुसार आपल्या सर्वात महत्त्वाचे घटक, अर्थात बूमर्स वाढविण्यासाठी कर्ज-वित्तपुरवठा कर कपात करण्याच्या धोरणासाठी वचनबद्ध आहे. खरंतर, अमेरिकेत सुमारे 60% घरगुती संपत्तीवर बूमरचा हक्क आहे. स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर, करोडपति लोकांकडे सुमारे 3% हिस्सा आहे. सामाजिक सुरक्षिततेसह, उदाहरणार्थ, आम्ही एका अशा योजनेस वित्तपुरवठा करतो जी कोणत्याही प्रकारच्या साधनांच्या-चाचणीशिवाय अमेरिकन इतिहासातील काही सर्वात श्रीमंत लोकांना लाभ देते.
काही संशोधने असे दर्शवितात की, जुन्या पिढीला नव्या पिढीमध्ये त्यांचे प्रतिबिंब न दिसल्यास, ते त्यांच्या भविष्यात गुंतवणूक करण्यास कमी इच्छुक असतात. अमेरिकेत, बूमर पिढीमध्ये सुमारे 70% श्वेत आहेत आणि जेन झी मध्ये सुमारे 50% श्वेत आहेत. अमेरिकेचा लोकसंख्याशास्त्रीय बदल अपरिहार्य आहे. त्यामुळे, प्रश्न असा आहे की आम्ही एकत्रितपणे कार्य करून असे राष्ट्र निर्माण करू शकतो का जेथे आमच्या मूलभूत मूल्ये उत्तरमरित्या प्रतिबिंबित होतात, जे आमच्या भूतकाळातील खोलवर जखमांवर औषध लावू शकते आणि व्यक्तीची ओळख किंवा जन्मस्थानाला महत्त्व न देता समान संधी देते.

स्त्रोत: https://money.cnn.com/interactive/economy/diversity-millennials-boomers/
Snapchat साठी, आम्ही अमेरिकेत अशा खात्यांना प्रमोट करू शकत नाही, ज्यांचा संबंध वंशवादी हिंसा भडकवणाऱ्या लोकांशी आहे, मग ते कृत्य आमच्या प्लॅटफॉर्ममार्फत केले गेलेले असो किंवा बाहेरचे असो. आमचा डिस्कव्हर सामग्री प्लॅटफॉर्म हा एक क्युरेटेड प्लॅटफॉर्म आहे, जेथे कोणाला प्रमोट करायचे ते आम्ही ठरवितो. आम्ही सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी कठोर परिश्रम करण्याबद्दल वारंवार बोलत आहोत आणि आम्ही Snapchat वर जे बोलत आहोत, तेच प्रचारित सामग्रीसह मांडत राहू. जोपर्यंत स्नॅपचॅट वरील खात्यांवर प्रसारित केला जाणारा मजकूर हा आमच्या समुदायाच्या मार्गदर्शक दिशानिर्देशांनुसार असेल तोपर्यंत आम्ही कदाचित विभाजक लोकांना स्नॅपचॅटचे खाते सुरु ठेवण्याची परवानगी ही देऊ, परंतु आम्ही या खात्याची किंवा त्यावर प्रसारित केल्या जाणाऱ्या मजकुराची कधीही जाहिरात करणार नाही.
आपले मार्ग प्रेमाकडे वाळविण्यास कधीही उशीर झालेला नाही, आणि ही माझी प्रामाणिक आणि खरी आशा आहे की आपल्या या महान देशाचे नेतृत्व आपण संस्थापित केलेल्या तत्वांवर, आपल्या स्वातंत्र्य, समता आणि सर्वांसाठी न्याय या मूल्यांवर काम करेल.
जेव्हा वर्णभेद, हिंसाचार आणि अन्याय अशा गोष्टी समोर येतील तेव्हा आम्ही आमच्या कृतीमधून हे नेहमीच स्पष्ट करू की अशा गोष्टींसाठी इथे कोणतीही जागा नसेल, आणि आम्ही कधीही त्याची जाहिरात करणार नाही तसेच आमच्या व्यासपीठावर कधीही त्या गोष्टींस पाठिंबा देणार नाही.
याचा अर्थ असा नाही की, ज्यांच्या मताशी आम्ही सहमत नाही अशा लोकांची सामग्री आम्ही काढून टाकू किंवा काही व्यक्तींशी असंवेदनशीलरित्या वागत असलेली खाती बंद करू. आपल्या देशाच्या आणि जगाच्या भविष्याबद्दल बरेचसे वादविवाद आहेत. परंतु, आपल्या देशामध्ये मानवी जीवनाचे मूल्य आणि स्वातंत्र्य, समता आणि न्याय यासाठी सततच्या संघर्षाचे महत्त्व याबद्दल वादविवाद करण्यासाठी स्थान नाही. जे नेहमी शांतता, पेम आणि न्यायाच्या बाजूने उभे राहतात त्याच्या बाजूने आम्ही नेहमीच आहोत, आम्ही आमचे व्यासपीठ वाईट पसरविण्यापेक्षा चांगल्याला प्रोत्साहन देण्यासाठी वापरू.
हे मला माहित आहे की असेही खूप लोक आहेत, ज्यांना असे वाटते की आपल्या समाजामध्ये फक्त "काही व्यक्ती" वर्णद्वेषी आहेत किंवा फक्त काही ठिकाणी "अन्याय" आहे, याचा अर्थ "आपण सगळे वाईट" आहोत असा होत नाही. माझ्या मते, माणुसकी ही परस्परांशी जोडलेली आहे त्यामुळे आपल्यापैकी कोणीही दुखावले गेले, तर आपल्या सगळ्यांना दुःखाला सामोरे जावे लागते. जेव्हा आपल्यापैकी एकाला भूक लागते, तेव्हा आपण सारेजण भुकेले असतो. आणि जेव्हा आपल्यापैकी कोणीही गरीब असेल, तेव्हा आपण सारेजण गरीब असतो. जेव्हा आपले मौन कोना एका व्यक्तीला अन्याय करण्यासाठी सक्षम बनविते त्यावेळेस आपण एक आदर्श राष्ट्र निर्माण करण्यामध्ये अपयशी ठरलेले आहोत असे समजावे.
तुमच्यापैकी काहींनी विचारले असेल, की Snap समानता आणि न्यायाचे समर्थन करणाऱ्या संस्थांनी योगदान देईल का? याचे उत्तर हो असे आहे. परंतु, माझ्या अनुभवातून मी सांगू शकतो की, परोपकार हा आपल्यावर झालेल्या गंभीर अन्यायांवर एकच परिणाम करू शकत नाही. जरी आमचे कुटुंब वंचितांसाठी अर्थपूर्ण योगदान करण्याची संधी निर्माण करीत असतील,आणि न्यायाच्या रक्षकांचे दान देत असतील, तरी अशी परिस्थिती आपल्या समाजाची संपूर्ण पुनर्रचना करणे गरजेचे असल्याची जाणीव करून देते. खाजगीरित्या केलेले परोपकार हे परिस्थितीला ठिगळ लावू शकते किंवा प्रगतीला गती देऊ शकते, परंतु एकट्याने ही अन्यायाची खोल आणि मोठी भगदाडे बुजवू शकत नाहीत. एक संयुक्त राष्ट्र म्हणून, आपण ही दरी एकत्रितरित्या पार करू शकतो. स्वातंत्र्य, समता आणि सर्वांसाठी न्याय याकरिता आपण एकत्र येऊन प्रयत्नशील राहू.
आपल्यासमोर खूप मोठी आव्हाने आहेत. अन्याय आणि हिंसाचाराचा मोठा वारसा असलेल्या अमेरिकेमध्ये – जॉर्ज अहमूद आणि ब्रेओंना हे अगदी आत्ताचे बळी आहेत आणि आणखी बरेच अनामिक बळी आहेत – यामध्ये आपण सखोल बदल स्वीकारले पाहिजेत. केवळ आपल्या देशांमध्येच बदल घडविला पाहिजे असे नाही, तर तो आपल्या अंतःकरणामध्येही घडला पाहिजे. आपण सर्व मानव जातीला शांततेचा प्रकाश दिला पाहिजे आणि प्रेमाचे आलिंगन दिले पाहिजे.
तुम्ही शांततेत असावे ही सदिच्छा,
इव्हान