
तुमचे आवडते स्नॅपचॅट वर शोधा
Snap ची नवीन मोहीम ही वाढत्या निर्मात्या समुदायाला स्पॉटलाइट करते
Snapchat मध्ये निर्माते हे केंद्रस्थानी असतात आणि आमच्या समुदायाला त्यंची सामग्री आवडते. खरं तर, Snapchat वर दररोज निर्माते आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये जवळजवळ 15 अब्ज परस्पर-संवाद होतात. 1
आमच्या प्लॅटफॉर्मवरील उत्कृष्ट निरमात्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही काम करत असताना, Snapchat वर आणि बाहेर असलेल्यांना त्यांचे आवडते सामग्री निर्माते कुठे शोधता येतील हे माहित असेल हे आम्हाला सुनिश्चित करायचे आहे.
म्हणूनच आज Snap एक नवीन निर्माता-चालित “Snapchat वर तुमचे आवडते शोधा” ही मोहीम सुरू करत आहे, जी संपूर्ण अमेरिकेतील विविध डिजिटल चॅनेलवर सुरू होईल.
काही सर्वात लोकप्रिय निर्माते, जसे लॉरेन ग्रे, सवाना डेमर्स, मॅट फ्रेंड, अवनी ग्रेग, आणि हॅरी जॉसीयांच्यासह “तुमचे आवडते Snapchat वर शोधा” तुम्हाला Snapchat वर निर्माते त्यांच्या प्रेक्षकांशी प्रामाणिक आणि अर्थपूर्ण मार्गांनी कसे जोडले जात आहेत याची झलक देते. हे पहा:
Snapchat ने मला माझ्या चाहत्यांशी वैयक्तिक पातळीवर अधिक जोडण्यास मदत केली आहे. मी बऱ्याच वर्षांपासून Snapchat वापरत आहे आणि अजूनही हे माझे सर्वात जास्त वापरले जाणारे अॅप आहे. हे मला माझ्या स्वतःच्या खऱ्याखुऱ्या रूपात रिवॉर्ड प्राप्त करू देते.
Snapchat हा खऱ्या अर्थाने समुदाय वाढवण्यासाठी सर्वोत्तम आणि सोपा प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे मोहीम राबवणे सुलभ होते. इतर अॅप्सच्या बाबतीत असे वाटते की, त्यांना खूप क्युरेट करावे लागेल, परंतु Snapchat वर कोणताही दबाव नसून असे वाटते, की मी जणू माझ्या मित्रमैत्रिणींशी बोलत आहे. Snapchat वर दररोज पोस्ट केल्याने माझ्या पॉडकास्टच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचे पाहून आनंद झाला, कारण तेच मला खऱ्या अर्थाने ओळखतात.
आमच्या निर्मात्यांना Snapchat वर यश मिळवण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे मार्ग देतो. निर्मात्यांना पाठिंबा देण्याच्या आमच्या प्रयत्नांमुळे 2024 च्या तिसऱ्या तिमाहीत सामग्री पोस्ट करणाऱ्या निर्मात्यांच्या संख्येत वर्षानुवर्षे अंदाजे 50% वाढ झाली आहे. 2Snapchat वर सामग्री पाहण्यात घालवलेला एकूण वेळ मागील वर्षाच्या तुलनेत 25% वाढलेला आहे आणि 2024 च्या तिसऱ्या तिमाहीत Spotlight सरासरी 500 दशलक्षाहून अधिक मासिक सक्रिय वापरकर्त्यांपर्यंत पोहोचले असल्याचे आम्ही रिपोर्ट केले आहे. 3
आम्ही अलीकडेच आमच्या पात्र निर्मात्यांना त्यांच्या सामग्रीमध्ये वैशिष्ट्यीकृत जाहिरातींमधील कमाईचा वाटा मिळवण्यास सक्षम करणाऱ्या नवीन एकत्रित कमाई कार्यक्रमाची घोषणा केली आहे. आमचा Snap Star Collab Studio निर्माते आणि ब्रँडमधील भागीदारी वाढवण्यास मदत करतो 523 कार्यक्रम कमी प्रतिनिधीत्व असलेल्या समुदायांमधील निर्मात्यांना समर्थन देतो. आम्ही AR लेन्स निर्माते आणि डेव्हलपर्सयांच्यासाठी देखील कार्यक्रम ऑफर करतो. आमच्या निर्माता हबवर रिवॉर्ड मिळवण्याच्या पद्धतींबद्दल निर्माते अधिक जाणून घेऊ शकतात.